बँक ग्राहकांना मोठा धक्का! या आठवड्यात ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार

On: March 30, 2026 1:14 PM
Bank Holiday
---Advertisement---

Bank Holiday | मार्च महिन्याचा शेवट आणि नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात यामुळे देशभरातील बँकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विविध सण, प्रादेशिक सुट्ट्या आणि आर्थिक वर्षअखेरच्या प्रक्रियांमुळे या आठवड्यात अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँकेची महत्त्वाची कामे आधीच पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

30 मार्च ते 5 एप्रिल 2026 या कालावधीत देशातील विविध भागांत बँका सलग अनेक दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वेगवेगळ्या कारणांमुळे साधारण सहा दिवस बँक व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पगार जमा होण्यासही उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Bank Holiday March April 2026)

कोणत्या दिवशी बँका बंद राहणार? :

या आठवड्यातील सुट्ट्यांची मालिका 30 मार्चपासून सुरू होते. या दिवशी महावीर जयंतीनिमित्त कर्नाटकमधील बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर 31 मार्च रोजी महावीर जन्म कल्याणकामुळे दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे. (RBI Bank Holiday List)

त्यानंतर 1 एप्रिल रोजी ‘अकाउंट्स क्लोजिंग डे’ असल्याने देशातील बहुतांश बँका सर्वसामान्य ग्राहकांसाठी बंद राहतील. पुढे 2 एप्रिलला ‘मौंडी थर्सडे’मुळे काही राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल. 3 एप्रिल रोजी ‘गुड फ्रायडे’ असल्याने देशातील अनेक भागांत बँकिंग सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत.

Bank Holiday | पगार उशिरा जमा होण्याची शक्यता :

या सुट्ट्यांच्या मालिकेमुळे काही कर्मचाऱ्यांच्या पगारावरही परिणाम होऊ शकतो. साधारणपणे महिन्याच्या शेवटच्या दिवशी किंवा 31 मार्च रोजी पगार खात्यात जमा केला जातो. मात्र, त्या दिवशी सुट्टी असल्याने अनेक ठिकाणी वेतन जमा होण्यास विलंब होऊ शकतो. (Bank Holiday List)

तसेच 1 आणि 2 एप्रिललाही बँकांचे कामकाज मर्यादित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांचा पगार 4 एप्रिलला जमा होऊ शकतो. मात्र, जर कोणत्याही कारणामुळे विलंब झाला तर 5 एप्रिल हा रविवार असल्याने वेतन 6 एप्रिलपर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

News Title : Bank Holidays This Week: Banks Closed for 6 Days in Many States; Salary Credit May Be Delayed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now