बँक ग्राहकांनो लक्ष द्या! सलग ४ दिवस बँका बंद राहणार

On: January 5, 2026 7:45 PM
Bank Holiday
---Advertisement---

Bank Holiday | नव्या वर्षाची सुरुवात झाली असली, तरी जानेवारी महिन्याच्या अखेरीस बँकिंग व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे. सण, सार्वजनिक सुट्ट्या आणि बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 24 ते 27 जानेवारी 2026 या कालावधीत बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे वेळेत नियोजन न केल्यास सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. (Bank holidays January 2026)

ज्यांचे रोख व्यवहार, चेक क्लिअरन्स, कर्जाशी संबंधित काम किंवा अन्य महत्त्वाची बँकिंग कामे प्रलंबित आहेत, त्यांनी ती 23 जानेवारीपूर्वीच पूर्ण करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा थेट फेब्रुवारी महिन्याची वाट पाहावी लागू शकते.

का राहणार बँका सलग चार दिवस बंद? :

जानेवारी महिन्याच्या अखेरीस सुट्ट्यांचा आणि संपाचा योग एकत्र येत आहे. 24 जानेवारी हा महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद असतील. 25 जानेवारी रोजी रविवार असल्यामुळे साप्ताहिक सुट्टी आहे. तसेच 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन असल्याने देशभर सार्वजनिक सुट्टी आहे. यानंतर 27 जानेवारी रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. (Bank Holiday)

या चारही कारणांमुळे सलग चार दिवस बँकांचे प्रत्यक्ष कामकाज पूर्णपणे ठप्प राहणार आहे.

Bank Holiday | बँक कर्मचारी का संपावर जाणार? :

बँक कर्मचारी संघटना अनेक दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. त्यामध्ये पाच दिवसांचा आठवडा, वेतनवाढ, पेन्शनसंबंधी प्रश्न आणि कामाच्या ताणतणावाशी संबंधित मुद्दे प्रमुख आहेत. सध्या फक्त दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी असते, मात्र सर्व शनिवार सुट्ट्या असाव्यात, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने 27 जानेवारीला संप पुकारण्यात आला आहे. (Bank holidays January 2026)

सलग चार दिवस बँका बंद राहिल्यामुळे ATM मध्ये रोख रकमेचा खडखडाट जाणवण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः शहरांमध्ये आणि व्यावसायिक भागात ATM लवकर रिकामे होण्याचा धोका आहे. अचानक पैशांची गरज भासल्यास नागरिकांची तारांबळ उडू शकते. व्यापाऱ्यांसाठीही हा काळ कठीण ठरणार असून, रोख जमा करण्याचे व्यवहार रखडू शकतात.

News Title: Banks to Remain Closed for 4 Consecutive Days in January 2026, Check Dates Now

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now