“लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींचा माईक बंद केला”, नवनिर्वाचित खासदारांचा गंभीर आरोप

Balwant Wankhede | लोकसभा निवडणूक झाली. संसदेत नुकताच शपथविधी देखील पार पडला. कोणी इंग्रजीत शपथ घेतली. तर, कोणी मराठीत शपथ घेतली. याचदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची संसदेत विरोधीपक्ष नेते म्हणून निवड करण्यात आली. मात्र त्यानंतर आता विरोधीपक्ष नेते राहुल गांधींचा माईक बंद केल्याचा धक्कादायक आरोप महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांनी केला आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे हुकूमशाहासारखी वागणूक देत आहेत. आज विरोध पक्षाचा हक्क असताना बोलून दिलं नाही, असं बळवंत वानखेडेंनी (Balwant Wankhede) माध्यमांसोबत बोलत असताना सांगितलं आहे. विरोधी पक्ष नेते चर्चा करण्यासाठी उभे राहतात. मात्र राहुल गांधी उभे राहिल्या बरोबर माईक बंद केला, असं वानखेडे म्हणाले.

बळवंत वानखेडे नेमकं काय म्हणाले?

सभागृहात विरोधी पक्ष नेते हे चर्चा करण्यासाठी असतात. परंतु आमचे नेते राहुलजी गांधी हे उभे राहिले. त्याबरोबरच त्यांचा माईक बंद करण्यात आला असल्याचं बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) म्हणाले. लोकसभा अध्यक्षांची भाषा देखील चांगली नाही. मी माईक बंद करत आहे असं लोकसभा अध्यक्ष सांगत आहेत. हे अत्यंतं चुकीचं असल्याचं बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) म्हणाले आहेत. सभागृहात सर्वांना सारखं ठेवण्यासाठी अध्यक्ष असतात. मात्र एका पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं वागतात.

दूध भुकटी आयात प्रकरणावर बळवंत वानखेडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकार असेल तसेच राज्य सरकार असेल ते  आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत, शेतकऱ्यांचे कैवारी आहोत, असं सांगतात. शेतकऱ्यांचं ही लोकं मरण करत आहेत, असं बळवंत वानखेडे म्हणाले आहेत.  

दिल्ली विमानतळ अपघाता प्रकरणी बळवंत वानखेडेंचं भाष्य

दिल्ली विमानतळावर अपघात झाला. दिल्ली विमानतळाचे छत कोसळल्याने हा अपघात झाला आहे. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणावरही बळवंत वानखेडे यांनी भाष्य केलं आहे. विमानतळाचे मोठ मोठे कॉन्ट्रॅक्ट मॅनेज करून दिलेले आहेत. त्यानंतर त्याचा मोठा फायदा उद्योगपतींना झाला, असं बळवंत वानखेडे म्हणाले आहेत.

News Title – Balwant Wankhede Slam To Om Birla About Raul Gandhi Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या बजेटमध्ये कुणाला काय मिळालं?; A To Z माहिती वाचा एका क्लिकवर

वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार, अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

सर्वात मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त; अजित पवारांची मोठी घोषणा

राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा; वाचा सविस्तर

गुड न्यूज! महिलांना दर महिन्याला मिळणार ‘इतके’ रुपये; शिंदे सरकारची मोठी घोषणा