“संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं”; नवीन खुलासा समोर

On: December 25, 2024 12:14 PM
Santosh Deshmukh Case
---Advertisement---

Santosh Deshmukh murder case | बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 17 दिवस उलटून गेले आहेत. मात्र, यातील मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. अजूनही यातील 3 आरोपी फरार आहेत. सरपंच देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली, असे आरोप करण्यात येत आहेत. अशात शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी एक नवीन खुलासा केलाय. आज 25 डिसेंबररोजी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Santosh Deshmukh murder case)

“मी अगोदरपासून म्हणतोय संतोष देशमुख यांना टॉर्चर करून करून मारलंय. तू असं करशील का? तसं करशील का? असं टॉर्चर करून करून त्यांना मारण्यात आलं. त्यांच्या पोस्टमार्टममध्ये 56 व्रण असल्याचं समोर आलंय. पोटावर, गुडघे,छातीवर त्यांना मारलं. असा काय गुन्हा होता त्यांचा?”, असा संतापजनक सवाल बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केलाय.

काय म्हणाले बजरंग सोनावणे?

संतोष देशमुख 10 वर्षांपासून राजकारणात आहे.उत्तम काम करणारा माणूस होता त्याला ठार करण्यात आलं. संतोष देशमुख यांची हत्या टॉर्चर करुन करण्यात आली आहे हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे. त्याने गावातल्या वॉचमनला मदत केली ही त्याची एवढी मोठी चूक घडली का? जर पोलीस अधीक्षकांनी वेळीच गुन्हा नोंद केला असता तर कदाचित पुढे गोष्टी घडल्या नसत्या, असं बजरंग सोनावणे म्हणाले. (Santosh Deshmukh murder case)

या प्रकरणात पोलीस उप निरीक्षक यांना निलंबित करण्यात आलंय. त्यांचा सहभाग तपासणं गरजेचं आहे. कारण पोलीसांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ते आरोपींबरोबर दिसत आहेत. हे खंडणीचं प्रकरण आहे पण ते वेगळं कारण त्याचा देशमुख यांच्याशी काही संबंध नाही. 9 डिसेंबररोजी आरोपींना जामीन मिळाला. त्यानंतर पीएसआय पाटील त्यांच्याबरोबर होते. त्यामुळे पाटील कटात सहभागी होते का? हा प्रश्न निर्माण होतो असं बजरंग सोनावणेंनी म्हटलंय.

“संतोष देशमुखांवर पाळत ठेऊन…”

संतोष देशमुख यांच्यावर पाळत ठेवली गेली. त्यांना मारत बाहेर काढलं गेलं त्यानंतर त्यांचं अपहरण केलं. त्यानंतर परत टाकळी फाट्यावर आणलं गेलं असं पोलीस सांगत आहेत. मात्र त्या दिवशी साडेचारच्या सुमारास मला फोन आला होता की संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आहे. नंतर त्याच दिवशी संध्याकाळी साडेसहाला कळलं की संतोष देशमुख यांची हत्या झाली. हे ऐकून मला घाम फुटला, असंही पुढे सोनावणे म्हणाले. (Santosh Deshmukh murder case)

News Title –  bajrang sonawane on Santosh Deshmukh murder case

महत्त्वाच्या बातम्या-

“1500 रुपये देण्यासाठी बहीणींच्या नवरे व भावांना बेवडे बनवणार”; ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार का? आदिती तटकरेंनी दिलं उत्तर

“20-22 वर्षांची पोरं हवेत गोळीबार करतात, ‘गँग्स ऑफ बीड’चे धनी कोण?”

2100 की 1500?, येत्या चार दिवसात खात्यात येणार पैसे; महिलांनो ‘असं’ करा चेक

दुःखद घटना! लष्कराच्या गाडीला भीषण अपघात, ‘इतक्या’ जवानांचा जागीच मृत्यू

Join WhatsApp Group

Join Now