Badlapur Rape Case | बदलापूर येथे दोन चिमुरड्या मुलींसोबत घडलेल्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आपली मुलं शाळेत देखील सुरक्षित नसल्याने पालक देखील धस्तावले आहेत. प्रत्येक ठिकाणी पालक आपल्या मुलांसोबत राहू शकत नाही त्यामुळे मुलांना काही गोष्टी शिकवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर मानसोपचार तज्ज्ञांनी पालकांना अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
तज्ज्ञांचा पालकांना सल्ला
पालकांनी जागरूक असणं आवश्यक आहे. पालक जेव्हा मुलाला शाळेत पाठवतात तेव्हा ते बिनधास्त असतात या विश्वासावर राहणं आता जमणार नाही. सोबतच मुलांना लैंगिक शिक्षण बॅड टच गुड टच काय असतो हे सांगितलं पाहिजे. बॅड टच म्हणजे वाईट अर्थाने केलेला स्पर्श, गुड टच म्हणजे सर्वसाधारणपणे केलेला स्पर्श, याची माहिती पालकांनी मुलांना द्यावी.
ओळखीच्या लोकांकडूनच असे कृत्य केले जातात त्याच्या हालचालीवर लक्ष दिले पाहिजे. तसेच सामाजिक स्तरावर लैंगिक शिक्षणावर जनजागृती केली पाहिजे, मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलं.
Badlapur Rape Case | पालकांनी जागरूक असावं
जेव्हा एखाद्या लहान मुलांना, मुलींना ते घेतात कशी जवळीक साधतात, त्यांना काय अमिष देतात यावर बारकाईने लक्ष दिलं तर याचा अंदाज देऊ शकतो. पालकांनी जागरूक असणे आवश्यक आहे.
शक्यतो ओळखीचे, नातेवाईक किंवा आजूबाजूचे हीच लोक या विकृतीमध्ये सहभागी असतात. हे जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्यावर कोणाचाही संशय येत नाही. लहान बालक कमजोर असतात म्हणून ते त्यांना प्रतिकार करू शकत नाहीत.
जेव्हा एखादी संस्था कर्मचारी ठेवते तेव्हा त्यांची पार्श्वभूमी माहीत करून घेतली पाहिजे. शाळा संस्थांमध्ये लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे, चाइल्ड पोर्नोग्राफी यावर कडक निर्बंध आणले पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! भाजपच्या विद्यमान आमदारांचं भविष्य धोक्यात?
ऐश्वर्या-अभिषेकचं लग्न थांबवण्यासाठी जान्हवी कपूरने कापली होती नस; मोठा खुलासा समोर
पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; IMD कडून महत्वाचा इशारा
“बावनकुळे राजकारणातली वाया गेलेली केस, त्यांनी..”; संजय राऊतांची जहरी टीका
गुडन्यूज! PM आवाज योजनेत आता ‘या’ लोकांनाही मिळेल हक्काचे घर






