Bachchu Kadu | प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. आज (18 जून) माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी महायुतीमधील मतभेद उघड करत भाजपबाबत खळबळजनक खुलासे केले. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे महायुतीमध्ये कुणाला किती जागा मिळणार?, याबाबत सर्वांचं लक्ष लागून आहे. आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकत्र बैठक झाली. शिंदे यांच्या निवासस्थानी महायुतीची खलबतं झाल्याची माहिती आहे. अशात बचू कडू यांच्या नव्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
“एकनाथ शिंदेंना घेतल्यानंतर युतीचं सरकार सुरळीत चालू होतं. पण,नंतर शिंदेंना शह देण्याकरता अजित दादांना सोबत घेतलं गेलं. मात्र, हा डाव उलटला. याच्या उलट निकाल लागला.”, असं बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले आहेत.
“युतीच्या सरकारमध्ये अजित दादा यांना हाती घेऊन शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न केला गेला. पण, जनतेला अधिकचं राजकारण पटत नाही. भाजपने अजित पवार गटाला जागावाटपमध्ये नाक दाबून बुक्क्यांचा मार दिला.”, असा टोला देखील बच्चू कडू यांनी लगावला आहे.
बच्चू कडू यांचा भाजपवर आरोप
दरम्यान, बच्चू कडू लोकसभा निवडणुकीपासून महायुतीच्या विरोधात बोलताना दिसून आले आहेत. त्यांनी लोकसभेत महायुतीचा घटक असूनही अमरावती येथे भाजपविरोधात उमेदवार दिला होता. याचा महायुतीला बराच फटका बसला.
त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांनी विधानसभा निवडणुकीतही उमेदवार देणार असल्याची घोषणा केली होती. “येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही 20 ते 25 जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. अमरावती जिल्ह्यात उमेदवार देणारच आहोत. पण राज्यात इतर ठिकाणीही उमेदवार देणार आहोत.सोबतच बडनेरा विधानसभा मतदारसंघातही उमेदवार देणार आहोत.”, अशी घोषणाच बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केली होती. अशात त्यांनी भाजपवर पुन्हा हल्लाबोल केला आहे.
News Title : Bachchu Kadu serious allegations against BJP
महत्त्वाच्या बातम्या-
‘बाईच्या नादामुळं जो बापाचा नाय झाला…’, या खेळाडूवर पत्नीचा खळबळजनक आरोप
पोलीस भरती पुढे ढकला; ‘या’ नवनिर्वाचित खासदाराची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! आज बँक खात्यात जमा होणार 2000 रुपये
उद्यापासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरवात; पाऊस आला तर काय होणार?






