Bacchu Kadu | मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन आणि उपोषण करत आहेत. त्यांनी सरकारला एका महिन्यांचा अवधी दिला आहे. यामुळे मनोज जरांगेंनी महिन्यासाठी उपोषण स्थगित केलं. अशातच दुसरीकडे ओबीसी समाजाचे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी देखील ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवण्यासाठी आज सात दिवसांपासून उपोषण केलं आहे. यामुळे आता ओबीसी विरूद्ध मराठा यांच्याच वादाची ठिणगी पेटली आहे.
“छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी एकत्र यावं”
याचप्रकरणात आता प्रहारचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) मोठं वक्तव्य केलं आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एकत्र यावे. त्यांनी जातीचा संघर्ष थांबवावा, असं बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले आहेत. यासाठी मी त्या दोघांच्याही भेटीसाठी जाणार असल्याचं वक्तव्य बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) केलं आहे.
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात जातीवाद निर्माण होऊ लागला आहे. हे थांबलं पाहिजे. एका बाजूला कोकणातील मराठ्यांनी ओबीसी समाजातून आरक्षणासाठी विरोध दर्शवला आहे. तर मराठवाड्यातील मराठा समाज बांधवांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे. यावर सध्याच्या आरक्षणात वाढ म्हणून तोडगा काढावा, असं बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले आहेत.
“भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी एकत्र लढाई
लढवावी”
ही लढाई भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी एकत्र लढवावी आणि हा जातीचा संघर्ष थांबवावा, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. यासाठी आता मी स्वत: भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं आहे. यामुळे आता बच्चू कडू (Bacchu Kadu) मनोज जरांगे पाटील आणि भुजबळांना एकत्र आणतील का?, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
मराठा समाज गेल्या काही दिवसांपासून आंदोलन आणि उपोषण करत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं आहे. मात्र ओबीसी समाज हा मराठा समाजाला वैयक्तिक आरक्षण द्यावं ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये याची दक्षता घेण्यासाठी सरकारकडे ओबीसी समाज मागणी करत आहे. यामुळे आता ओबीसी विरूद्ध मराठा समाज यांच्यात कलगीतुरा सुरू आहे.
News Title – Bacchu Kadu Statement On Manoj Jarange Patil And Chhagan Bhujbal
महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी! आणखी एका भयंकर अपघाताने पुणे हादरलं
‘आधी बळीचा बकरा बनवलं, आता…’; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
ऐश्वर्या आणि जया बच्चन यांचं बिनसलं?; ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
‘तुमच्या बुडाखाली…’; किरण मानेंनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं
प्रसाद देठेंची सुसाईड नोट चर्चेत; पंकजा मुंडेंचंही घेतलं नाव






