Baba Siddique Murder l दसऱ्याच्या (12 ऑक्टो) दिवशी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. वांद्रे या ठिकाणी झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरच ही धक्कादायक घटना घडली आहे. तसेच या गोळीबारातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली आहे. मात्र या घटनेसंदर्भात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
आरोपींकडे मिळाला एक पेपर स्प्रे :
या घटनेतील दोन आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे तर तिसरा आरोपी फरार आहे. मात्र तिसऱ्या आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांचे 15 पथक तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान या दोन आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या आरोपींकडून दोन पिस्तुल आणि तब्ब्ल 28 राऊंड जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय त्यांच्याकडे एक पेपर स्प्रे देखील होता.
गुन्हे शाखेचे डीसीपी दत्ता नलावडे यांनीयासंदर्भात माहिती दिली आहे. या हत्येमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या कथित सहभागाची चौकशी देखील चालू आहे. बाबा सिद्दीकी यांना वर्गीकृत सुरक्षा नव्हती पण त्यांना मुंबई पोलिसांकडून 3 सुरक्षा कर्मचारी देखील देण्यात आले होते. मात्र घटनेच्या वेळी एक सुरक्षा कर्मचारी बाबा सिद्दीकी यांच्यासोबत होता. त्यामुळे आता पोलीस सलमान खानसह या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत.
Baba Siddique Murder l पेपर स्प्रे का आणला होता? :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हल्ल्यासाठी आरोपींनी पेपर स्प्रे आणला होता. आरोपी आधी हल्लेखोर पेपर स्प्रे फवारणार होते आणि त्यानंतर गोळीबार करणार होते. परंतु तिसरा आरोपी हा शिवकुमार गौतम याने थेट गोळीबार सुरू केल्यामुळे ते पेपर स्प्रे वापरू शकले नाहीत.
या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांच्यासोबत त्यांचा एक सहकारी दखल होता. हल्लेखोरांच्या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा सहकारी देखील जखमी झाला आहे. तसेच आता मुंबई पोलीस या घटनेचा पुढील तपस करत आहेत.
News Title – Baba Siddique Murder
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात ‘लाडक्या बहिणीचा’ मृत्यू
मुंबईत टोलमाफी! राज ठाकरे म्हणाले,”आमच्या आंदोलनाला यश..”
महागड्या गाड्या, आलिशान घर, बाबा सिद्दीकींच्या संपत्तीचा आकडा समोर
आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय!
मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंकडून टोलमाफीची घोषणा, पण नेमकी कुठे?






