Baba Siddique Firing l महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी तीन गोळ्या झाडण्यात आल्या, त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र लीलावती रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला आहे.
Baba Siddique Firing l गोळीबारात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू :
आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच म्हणजेच बांद्रा पूर्वेत खेरवाडी परिसरात ही घटना घडली आहे. वांद्रे पूर्वेतील बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला, ही घटना निर्मल नगर पोलीस ठाण्यांतर्गत असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी दोन दोघांना अटक करण्यात आली आहे. यावेळी अज्ञातांनी सिद्दीकी यांच्यावर पाच ते सहा गोळ्या झाडल्या. मात्र त्यातील तीन गोळ्या त्यांना लागल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.
बाबा सिद्दीकी यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडचा नेता सलमान खानही लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचला आहे. बाबा सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा देखील प्रदान करण्यात आली होती. तसेच गेल्या पंधरा दिवासांपूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील आली होती. मात्र आज त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे.
News Title – Baba Siddique Murder
महत्त्वाच्या बातम्या-
अजित पवार गटाच्या ‘या’ आमदाराने केली रावणाची महाआरती!
मी राजकारणाला चिटकून बसणारी नाही…पंकजा मुंडे फक्त एकाच गोष्टीला घाबरते
“आमचा धक्का लागतो म्हणता, मग आता..”; जरांगे पाटलांची सरकारला केली थेट विचारणा!
आता उलथापालथ करावीच लागेल, पर्यायच नाही; मनोज जरांगे कडाकडले
घरात सुख-समृद्धीसाठी आज राशीनुसार ‘या’ वस्तु खरेदी करा!






