अक्षर पटेलचा पारा चढला! पराभवानंतर ‘या’ खेळाडूंना झापले!

On: April 14, 2025 1:54 PM
Axar Patel
---Advertisement---

Axar Patel angry l आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा निराशाजनक पराभव मुंबई इंडियन्सने (MI) 13 एप्रिल रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर 12 धावांनी केला. या सामन्यांनंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल (Axar Patel angry) संतापलेला आणि स्पष्टपणे नाराज दिसून आला. त्याने पराभवाचे खापर थेट मधल्या फळीतील फलंदाजांवर फोडत, खराब शॉट सिलेक्शनला जबाबदार ठरवले.

मुंबई इंडियन्सने (MI) प्रथम फलंदाजी करत 206 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. सामना दिल्लीच्या पकडीत असतानाच करुण नायर बाद झाला आणि त्यानंतर संपूर्ण डाव कोसळला. कर्ण शर्मा आणि मिशेल सँटनर यांच्या यशस्वी गोलंदाजीने मुंबईने सामन्यात जोरदार पुनरागमन केलं. (Axar Patel angry)

“मधल्या फळीतील फलंदाजांनी जबाबदारी घेतली नाही” – अक्षर पटेल :

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अक्षर पटेलने (Axar Patel) स्पष्टपणे सांगितले की, “हा सामना आम्ही सहज जिंकू शकत होतो. पण मधल्या फळीतील काही फलंदाजांनी बेजबाबदार शॉट्स खेळले. अशा सामन्यात प्रत्येक वेळेस खालच्या फळीतील खेळाडू सामना वाचवतील अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे.”

त्याने पुढे सांगितले की, “केवळ 12 धावा बाकी असताना आमच्याकडे एक षटक शिल्लक होतं. या क्षणाला संयमाने खेळणे गरजेचे होते. पण काही चुकीचे निर्णय आणि शॉट्समुळे सामना हातून निसटला.”

गोलंदाजांचं कौतुक, झेल चुकल्याबद्दल खंत :

अक्षर पटेलने करुण नायरच्या इम्पॅक्ट सब म्हणून कामगिरीचं कौतुक केलं. त्याचप्रमाणे, क्षेत्ररक्षणातील चुका आणि झेल गाळल्याबद्दल खंतही व्यक्त केली. “जर झेल गाळले गेले नसते, तर आम्ही कदाचित 205 ची जागा 180-185 मध्ये रोखू शकलो असतो,” असं त्याचं म्हणणं होतं. (Axar Patel angry)

फिरकी गोलंदाजांविषयी बोलताना तो म्हणाला की, “माझ्या ताफ्यात तीन चांगले फिरकीपटू आहेत. कुलदीप यादवने सातत्याने विकेट्स घेतल्या आहेत. जेव्हा विकेट्सची गरज असते, तेव्हा आम्ही कुलदीपवर विश्वास ठेवतो.”

News Title: Axar Patel Slams Middle-Order Batters After DC’s 12-Run Loss to MI – Says ‘This Game Was Ours

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now