Shubman Gill Girlfriend l भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल (Shubman Gill) आणि अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) यांच्यातील कथित नात्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अवनीतचं नाव राघव शर्मा (Raghav Sharma) याच्यासोबत जोडलं जात होतं. मात्र, आता तिला शुभमन गिलसोबत डेट करत असल्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
दुबई स्टेडियममधील उपस्थितीने चर्चेला उधाण :
अवनीत कौरने नुकताच ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्याचा आनंद घेतला. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये ती सामन्याचा आनंद घेत असतानाचे फोटो शेअर केल्यानंतर, नेटकऱ्यांनी तिच्यावर तुफान टीका केली. ‘क्रिकेटबद्दल काहीही माहिती नाही आणि फक्त क्रिकेटपटूंना इम्प्रेस करण्यासाठी सामना पाहत आहे’, अशी टीका तिच्यावर होत आहे.
अवनीतने भारतीय संघाच्या विजयाचा आनंद व्यक्त करताना नाचतानाचा एक व्हिडीओ शेअर केला. मात्र, या व्हिडीओमुळेही तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. “तिला क्रिकेटबद्दल काहीही माहिती नाही, कोणीतरी सांगितलं म्हणून तिला कळलं की भारत जिंकलाय,” अशा प्रकारच्या कमेंट्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
Shubman Gill Girlfriend l शुभमन गिल आणि अवनीत कौरच्या नात्याबद्दल काय सत्य? :
शुभमन गिल आणि अवनीत कौर यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या असल्या तरी, दोघांनीही अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ही केवळ अफवा आहे की त्यात काही तथ्य आहे, हे सांगणं सध्या कठीण आहे.
अवनीत कौर आणि राघव शर्मा यांच्या नात्याविषयीही अनेक गोष्टी समोर येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, राघव आणि अवनीत अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, पण करिअरवर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी हे गुप्त ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
सोशल मीडियावर शुभमन गिल आणि अवनीत कौर यांच्या नात्याची चर्चा रंगली असली तरी, त्यावर दोघांचेही मौन आहे. पुढील काही दिवसांत हे दोघं सोशल मीडियावर कशी प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.






