निलंगेकर यांना पाठबळ देण्याची गरज; अवधूत गुप्ते

On: October 28, 2024 6:09 PM
Avadhoot Gupte
---Advertisement---

Avadhoot Gupte l सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवधूत गुप्ते यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. आ.संभाजीराव पाटील निलंगेक यांचं कुटुंब हे एक संस्कारक्षम कुटुंब असून ते एक सुसंस्कृत राजकीय नेतृत्व असल्याचं अवधूत गुप्ते म्हणाले आहेत.

या नेतृत्वाला प्रचंड मताधिक्याने विजयी करा :

यावेळी अवधूत गुप्ते म्हणाले की, निलंगेकर यांच्या सुसंस्कृत राजकीय नेतृत्वामुळे त्यांच्या परिवाराशी माझे अनेक वर्षांचे ऋणानुबंध जुळलेले आहेत. तसेच निलंग्यातील जनतेने या नेतृत्वाला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी केले आहे.

आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासाठी अवधूत गुप्ते यांनी एक गीत देखील रेकॉर्ड केले आहे. त्यानंतर मतदारसंघातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधताना गुप्ते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अवधूत गुप्ते म्हणाले की, विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मी राज्यातील जवळपास सर्व मतदार संघामध्ये फिरलो आहे. परंतु केवळ काही ठिकाणीच माणसाचे ऋणानुबंध जुळतात तेथील मातीशी नाळ जोडली जाते.

Avadhoot Gupte l नेतृत्वाला पाठबळ देण्याची गरज :

याशिवाय निलंग्याची माती याच प्रकारची आहे. म्हणूनच अनेक वर्षांपासून मी निलंगाशी जोडला गेलो आहे. तसेच गुप्ते यांनी सांगितले की, 2021 यावर्षी मी कार्यक्रमासाठी निलंगा शहरात आलो होतो. एकदा आलो आणि निलंग्याचा होऊन गेलो. आ.संभाजीराव पाटील निलंगेकर व त्यांच्या परिवाराने मला आपलेसे केले. माझा वाढदिवस त्यांनी साजरा केला.मात्र आता या नेतृत्वाला पाठबळ देण्याची गरज आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येकाने मतदान करावे. तसेच आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांना प्रचंड मताधिक्याने विजय करावे. आ.संभाजीराव पाटील हे माणूस म्हणून एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व असल्याने त्यांना पुन्हा एकदा विजयी करून विधानसभेत पाठवावे असे आवाहनही गुप्ते यांनी आपल्या संदेशात केले आहे.

News Title – Avadhoot Gupte Statement On Sambhajirao Patil Nilangekar

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपची तिसरी यादी जाहीर! 25 उमेदवारांची नावे जाहीर

मनोज जरांगे पाटलांकडून पत्ते ओपन ; या तीन जातींवर खेळणार मोठा डाव

भोसरीत भाजपच्या लांडगेंचा टांगा पलटी होणार, लांडे घोडे फरार करणार?

भाजप एकनाथ शिंदेंचा गेम करणार?; शिंदेंना बसू शकतो मोठा धक्का

जळगावात महायुतीत वादाची ठिणगी, शिंदेंच्या उमेदवाराला भाजपकडूनच आव्हान

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now