टेलीग्रामला ‘ती’ एक चूक पडली महागात; भरावा लागला 55 कोटींचा दंड

On: February 25, 2025 9:57 AM
Telegram Fine
---Advertisement---

Telegram Fine l ऑस्ट्रेलियाच्या (Australia) ऑनलाइन सुरक्षा नियामकाने मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलीग्रामवर 55.47 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मुलांच्या शोषणासह हिंसक अतिरेकी सामग्रीच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी कोणती पावले उचलली, हे स्पष्ट करण्यास उशीर केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.

विलंबामुळे कारवाई :

विविध सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर आरोप होता की, लाईव्ह स्ट्रीमिंग फीचर्स, अल्गोरिदम आणि रिकमेंडेशन सिस्टममार्फत अतिरेकी गट नवीन सदस्यांची भरती करतात. यावर कंपन्या प्रतिबंध करत नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या ईसेफ्टी (eSafety) कमिशनने मार्च 2024 मध्ये यूट्यूब (YouTube), एक्स (X), फेसबुक (Facebook), टेलीग्राम आणि रेडिटकडून (Reddit) स्पष्टीकरण मागितले होते.

टेलीग्राम व रेडिटला मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री रोखण्यासाठी कोणती पावले उचलली, हे स्पष्ट करण्यास सांगितले होते. यासाठी मे 2024 पर्यंत वेळ दिला असताना टेलीग्रामने उत्तर ऑक्टोबरमध्ये दिले. या विलंबाबद्दल दंड आकारण्यात आला आहे.

टेलीग्रामने म्हटले आहे की, “आम्ही गेल्या वर्षी ईसेफ्टीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली होती आणि कोणतेही मुद्दे प्रलंबित राहिले नव्हते. हा दंड अन्यायकारक आहे, कारण केवळ उत्तर देण्यास उशीर झाला.” कंपनीने या निर्णयाविरोधात अपील करणार असल्याचे सांगितले.

नियामकांचे मत :

ऑस्ट्रेलियाच्या ईसेफ्टी कमिशनर जुली इनमॅन ग्रँट म्हणाल्या की, सर्व कंपन्यांनी कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. टेलीग्रामच्या विलंबाने सुरक्षा उपायांच्या अंमलबजावणीत अडथळे आले.

News Title: Australia Fines Telegram $550K for Delayed Response on Child Safety

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now