वृषभसह आज ‘या’ 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, धनलाभाचे संकेत

On: September 20, 2024 9:12 AM
Astrology
---Advertisement---

Astrology Panchang | आज शुक्रवार, 20 सप्टेंबररोजी चंद्राच्या दुसऱ्या भावात गुरु ग्रह असल्यामुळे सुनफा योग तयार होत आहे. याचबरोबर आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असून या तिथीला तृतीया तिथीचं श्राद्ध केलं जातं. श्राद्ध पक्षाच्या तिसऱ्या दिवशी ध्रुव योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्व वाढले आहे. या शुभ संयोगाचा काही राशीला फायदा होणार आहे. (Astrology Panchang)

‘या’ 5 राशींना देवी लक्ष्मी करणार धनवान

वृषभ रास : या राशीच्या लोकांना आज लक्ष्मीच्या कृपेने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही इतरांकडून सहजपणे कामं करून घेऊ शकाल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भविष्याविषयी चर्चा कराल आणि एकत्र तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक कराल.

कन्या रास : पितृ पक्षाचा तिसरा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी चांगला जाईल. तुम्हाला रिअल इस्टेट किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. आज तुम्हाला दुसऱ्या कंपनीकडून चांगल्या पगाराची ऑफर मिळू शकते. त्यामुळे झटपट निर्णय घ्या. (Astrology Panchang)

तूळ रास : या राशीच्या लोकांवर आज लक्ष्मीची कृपा असेल, ज्यामुळे त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात भरभरून यश मिळेल. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल आणि तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होईल.

मकर रास : आज तुम्हाला आर्थक लाभ होईल. खेळामध्ये कुशल असणाऱ्याला मोठी संधी मिळेल. आजचा दिवस कलागुणांना वाव देणारा असेल. आज तुम्ही दिवसभर आनंदी राहाल. घरात देखील प्रसन्न वातावरण राहील. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम आणि समजूतदारपणाची भावना राहील. (Astrology Panchang)

कुंभ रास : बचत केलेल्या पैशातून आज तुम्ही महत्वाची गोष्ट खरेदी कराल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. संध्याकाळी एखाद्या विद्वान व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला जवळची मैत्रीण भेटेल. बालपणीच्या आठवणी जागृत होतील. धार्मिक ठिकाणी भेट द्याल. (Astrology Panchang)

News Title : Astrology Panchang 20 September

महत्वाच्या बातम्या-

विधानसभेपूर्वीच पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?, कधी आणि किती रुपयांची होणार घसरण?

प्रेम, पद, पैशांचा मार्ग होणार मोकळा; ‘या’ राशींचे येणार अच्छे दिन

“अजित पवार गटाच्या पेजनं अश्लिल पेजला फॅालो केलं”, शरद पवार गटाच्या दाव्याने खळबळ

“लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या”; सलमान खानच्या वडिलांना का दिली धमकी

बिग बॉसमध्ये निक्की-संग्रामची मैत्री होणार; अरबाजाचं काय?

Join WhatsApp Group

Join Now