भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया

On: February 13, 2024 2:28 PM
Ashok Chavan
---Advertisement---

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये करताच अशोक चव्हाण यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया

मी काँग्रेसमधील सहकाऱ्यांचेही आभार मानतो. त्यांनी सहकार्य केलं. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे मी आलो. मी आज जास्त बोलणार नाही. मी पक्षात नवीन आहे. योग्यवेळी योग्य गोष्टी बोलणार आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

सर्वात आधी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा , फडणवीस, बावनकुळे, शेलार यांचे आभार मानतो. आम्ही विरोधात असतानाही राजकारणाच्या पलिकडेही आम्ही एकमेकांना साथ दिली आहे. आयुष्याची खरी सुरुवात करत आहे, असंही ते म्हणालेत.

“आयुष्याची खरी सुरुवात करत”

30 वर्षाच्या राजकीय प्रवासाचा बदल करत आहे. भाजपमध्ये प्रवेश करत आहे. मोदींच्या नेतृत्वात काम करणार आहे. मोदींची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करत आहे. वाटचाल करणार आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

मोदींनी सबका साथ सबका विकास हे ब्रीद ठेवून अनेक कामे केली. आम्ही मोदींच्या कामावर इम्प्रेस झालो आहे. आम्ही विरोधात असतानाही आम्ही वैयक्तिक टीका केली नाही. आम्ही चांगल्या कामाचं कौतुक केलं. देवेंद्र फडणवीस यांनीही आमच्याही कामाचं कौतुक केलं आहे. आजपासून पुढे आता आम्ही एकत्र काम करू, असं अशोक चव्हाण म्हणाले.

राज्यात भाजपला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचा प्रयत्न करणार आहे. माझा अनुभव पणाला लावेल. राजकारण हे सेवेचं माध्यम आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘विरुष्का’ पुन्हा आई-बाबा होणार?, मोठी बातमी आली समोर

राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल; जाणून घ्या आजचे दर

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाबाबत महत्त्वाची माहिती समोर!

‘भूल भुलैया 3’ मधून मंजुलिकाचं पुनरागमन होणार!

‘त्या कठीण काळात अक्षय कुमार सतत..’; श्रेयस तळपदेच्या पत्नीने केला मोठा खुलासा

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now