Maharashtra l सध्या राज्यात महायुतीच सरकार आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचा समावेश आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आल्यावर शिवसेना आमदार आणि पदाधिकारी प्रचंड नाराज झाले होते. मात्र असं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निधी दिला जात नसल्याची तक्रार वारंवार करण्यात येत होती. मात्र या सर्व प्रकरणावरून आता परभणी जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांने त्यांच्या विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या ज्ञानोबा व्हावळे यांनी विष प्रशान करण्याचा धक्कादायक प्रयत्न केला आहे. मात्र त्यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.
परभणी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादीचे पालकमंत्री असलेल्या नियोजन समितीतून त्यांना निधी मिळत नसल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानोबा व्हावडे यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यावेळी कोणतीही वाईट घटना घडली नाही.
Maharashtra l नेमका काय प्रकार घडला :
परभणी जिल्हा नियोजन समितीत निधी मिळत नसल्याने विरोधकच नाही तर सत्ताधारी गटात देखील नाराजी असल्याचं दिसून येत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदस्य देखील निधी मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार करत आहेत. मात्र त्यातूनच शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्याने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा पार पडली आहे. यावेळी नियोजन समितीतून निधी मिळत नसल्याने ज्ञानोबा व्हावळे यांनी जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कमुळे पुढील हा धक्कादायक अनर्थ टळला आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच पक्षाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्याने निधीसाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने महायुती सरकार मधील सगळेच टेन्शनमध्ये आले आहेत.
News Title : As funds are not available, an attempt is made to poison an office-bearer of the Shinde group
महत्वाच्या बातम्या-
T20 वर्ल्डकप स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम जाहीर, विजेत्या संघावर पडणार पैशाचा पाऊस
… तर फडणवीसांना गुडघे टेकवायला लावणारचं; कोणी दिला थेट इशारा
आज उभयचरी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; ‘या’ राशी होणार धनवान
आधारकार्ड वरील नाव बदलायचंय? तर लागतील ही कागदपत्रं
बाप्पा गेले गावी, राज्यात पावसाचं होणार पुन्हा आगमन; कुठे-कुठे बरसणार?






