Arbaz Patel Girlfriend l सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनची प्रचंड चर्चा सुरु आहे. कारण या सीझनने अनेक जुने रेकॉर्ड मोडले आहेत. अशातच या सीझनमध्ये स्पर्धक अरबाज पटेल हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे दररोजच चर्चेत असतो. कारण बिग बॉसच्या घरात अरबाज आणि निक्की तांबोळीची जवळीक पाहून सर्वच चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. या दोघांच्या अनोख्या नात्यामुळे सूत्रसंचालक रितेश देशमुखने देखील त्यांना भाऊचा धक्का दरम्यान सुनावलं होतं. मात्र आता अरबाज पटेल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अरबाजची गर्लफ्रेंड लिझा बिंद्रा निक्कीवर भडकली आहे.
अरबाजची गर्लफ्रेंड निक्कीवर भडकली :
गेल्या काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घराबाहेर असलेली अरबाजची गर्लफ्रेंड लिझा बिंद्राने त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचा इशारा दिला होता. अशातच लिझाने आता सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या असून त्यात तिने निक्की तांबोळीला चांगलंच सुनावलं आहे. त्याचप्रमाणे लिझाने अरबाजसोबतच्या नात्याची जाहीरपणे कबुली देखील दिली आहे.
लिझाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तीन वेगवेगळे पोस्ट केल्या आहेत. यातील पहिल्या पोस्टमध्ये तिने अरबाजची कायम साथ देणार असल्याचं म्हटलं आहे, तर दुसऱ्या पोस्टमध्ये ती निक्की तांबोळीवर भडकली आहे. तर तिसऱ्या पोस्टमध्ये लिझाने अरबाजसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं आहे.
Arbaz Patel Girlfriend l अरबाज चुकीचा नाही; लिझा बिंद्रा
यासंदर्भांत लिझा म्हणाली की, ‘मी अरबाजच्या आईला त्याच्यासाठी खूप प्रार्थना करताना पाहिलं आहे. तो या शोमध्ये फक्त आणि फक्त त्याच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अरबाज चुकीचा नाही. तो चुकीचा तेव्हा असता जेव्हा त्या मुलीला माहित नसतं की तो माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र यासंदर्भात दोन वेळा रितेश सरांनी सुद्धा निक्कीला सांगितलं आहे. तरीसुद्धा..’, अशी टीका तिने निक्कीवर केली आहे.
अरबाज पटेल हा याआधी स्प्लिट्सविला एक्स 5 या शोमध्ये देखील झळकला होता. त्यानंतर त्याने बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये भाग घेतला आहे. बिग बॉसच्या घरात अरबाज आणि निक्की तांबोळी यांच्यात जवळीक पहायला मिळाली आहे.
News Title : Arbaz Patel Girlfriend Leeza Bindra slams Nikki Tamboli
महत्त्वाच्या बातम्या-
शिंदे गटाचा ठाकरेंना मोठा धक्का; ‘हा’ नेता शिंदे गटात जाणार
पुण्यात गणपती पाहायला जाताय? तर ‘या’ ठिकाणी असणार पार्किंग सोय
केंद्राने शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय; होणार फायदाच फायदा
देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट!
ईद-ए-मिलादची सुट्टी 16 ऐवजी ‘या’ तारखेला मिळणार; सरकारने केला मोठा बदल






