Virat Kohli | भारतीय संघ अडचणीत असताना एकटा विराट कोहली प्रतिस्पर्धी संघाला भिडतो, याचा प्रत्यय अनेकदा पाहायला मिळाला आहे. सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतूनही हेच दिसत आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. सलामीच्या सामन्यात भारताला दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. यजमान आफ्रिकेनं एक डाव आणि 32 धावांनी मोठा विजय मिळवून विजयी सलामी दिली.
पहिला सामना गमावल्यामुळं दुसऱ्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणं भारतासाठी गरजेचं आहे. बुधवारपासून दुसऱ्या सामन्याला सुरूवात झाली आणि पहिल्याच दिवशी दोन्हीही संघांना फलंदाजी आणि गोलंदाजीची देखील संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, मोहम्मद सिराजनं यजमांनांना घाम फोडला. त्यानं सर्वाधिक सहा बळी घेतले आणि दक्षिण आफ्रिकेचा डाव केवळ 55 धावांवर आटोपला. खरं तर भारताला देखील आपल्या पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
Virat Kohli ची ‘विराट’ खेळी
आफ्रिकन संघ लवकर तंबूत परतल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीला आला. यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा लयीत दिसला. त्यानं सावध खेळी करून डाव पुढे नेला. पण तो 39 धावांत पॅव्हेलियनमध्ये परतला. मग भारताच्या विकेटांची जणू काही मालिकाच सुरू झाली, ज्याला विराट कोहली मात्र अपवाद ठरला. विराटने अखेरपर्यंत झुंज देत 46 धावांची अप्रतिम खेळी केली.
Virat Kohli ची विकेट अन् Anushka Sharma ची रिॲक्शन
Anushka Sharma & Athiya Shetty reaction on Virat Kohli ‘s wicket. pic.twitter.com/rChITZpcX5
— CricKeeda (@JustinKuldeep2) January 3, 2024
दरम्यान, भारताचे सात फलंदाज शून्य धावा करून बाद झाले. मात्र, विराट कोहली भारतीय चाहत्यांच्या आशा जिवंत ठेवत खेळपट्टीवर टिकून होता. परंतु, कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर जेव्हा किंग कोहली बाद झाला तेव्हा त्याची पत्नी अनुष्का शर्माची प्रतिक्रिया पाहण्याजोगी होती. तमाम भारतीयांच्या आशा पुढे नेणारा कोहली बाद झाला अन् अनुष्कालाही धक्का बसला. अनुष्कासोबत लोकेश राहुलची पत्नी अथिया शेट्टी पण दिसत आहे.
Virat Kohli ची सावध खेळी
सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर सामना बरोबरीत राहिला. भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना आफ्रिकेला अवघ्या 55 धावांत गुंडाळलं. विराट कोहलीच्या सावध खेळीच्या जोरावर टीम इंडियानं हिल्या डावात सर्वबाद 153 धावा केल्या आणि 102 धावांची आघाडी घेतली होती. विराटला इतर कोणत्याही फलंदाजाची साथ न मिळाल्याने भारताचा डाव 153 धावांत आटोपला. यजमानांनी आपल्या दुसऱ्या डावात 3 बाद 62 धावा केल्या असून त्यांच्याकडे 36 धावांची आघाडी आहे.
दुसऱ्या सामन्यासाठी जड्डू अन् मुकेश कुमारला संधी
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि मुकेश कुमार.
‘…तो दारु पिऊन धिंगाणा घालायचा, शिवाय शारीरिक…’; Aishwarya Rai ने केला मोठा गौप्यस्फोट
Health Update | शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासतेय?; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
Shreyas Talpade | “मी तर मेलो होतो, हा माझा दुसरा जन्म”, श्रेयस तळपदेनं सांगितली धक्कादायक आपबीती
Jheel Mehta | TMKOC फेम ‘सोनूला’ अखेर मिळाला रियल लाईफ टप्पू; लवकरच अडकणार लग्नबंधनात








