‘या’ शहरात भरतोय आगळावेगळा ‘घुबड महोत्सव’

On: November 30, 2022 7:33 PM
---Advertisement---

पुणे | इला फाउंडेशन या संस्थेच्या वतीने पिंगोरी (ता. पुरंदर) येथील ‘इला हॅबिटॅट’ येथे उलूक उत्सव दि. 1 व 2 डिसेंबर रोजी आयोजित केला आहे. या उत्सवामध्ये शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, व निसर्ग मित्रांसाठी विविध गोष्टी पाहण्याची व शिकण्याची संधी मिळणार आहे. या उलूक उत्सवामध्ये घुबड हा मानवासह शेतकऱ्यांचा मित्र आहे. घुबडांबद्दल समाजात मोठ्या अंधश्रध्दा आणि चुकीचे समज आहेत.

घुबडांच्या भारतात एकूण ४२ प्रजाती आढळत असून त्याची संपूर्ण माहिती सर्वांना व्हावी, या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उलूक उत्सवासाठी शेतकरी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध निसर्गप्रेमी संस्था, छायाचित्रकार, शिक्षक, शेतकरी आणि पालक आदींनी सहभागी व्हावे, अशी विनंती इला फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश पांडे यांनी केली आहे.

काय असेल उत्सवात पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे गुरुवारी सुरुवात व शुक्रवारी होणाऱ्या उलूक उत्सवामध्ये घुबडांची शास्त्रीय माहिती, सांस्कृतिक वारसा व महत्त्व समजण्यासाठी घुबडांच्या विविध कलाकृती, चित्रे, गायन, वादन, नाटिका, नृत्य, वक्तृत्व, पोवाडा, रांगोळी, मेहंदी काम, फेस पेंटिंग व लेख अशा अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे.

घुबड नाणी, पोस्टाची तिकिटे, विविध वस्तू, फ्रिजवरील घुबड, घुबडांची छायाचित्रे यांचे प्रदर्शन, लघुपट व माहितीपट अशा विविध माध्यमातून घुबडांची जीवनप्रणाली स्पष्ट केली जाणार आहे.

जागतिक पातळीवर दखल इला फाउंडेशनच्या वतीने 2018 ला आयोजन केलेल्या पहिल्या उलूक उत्सवाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. तर 2019 मधील उलूक उत्सवाची दखल जागतिक पातळीवर घेतली जाऊन, 22 देशांमधील संशोधक पिंगोरी येथे या उत्सवास भेट द्यायला आले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now