चिन्ह गेलं, पक्षही गेला, आता…; उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका

On: February 18, 2023 7:21 AM
---Advertisement---

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटलं जात आहे.

निवडणूक आयोगाच्या अहवालात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. ज्यामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जातं आहे.

ठाकरे गटाचा आणखी एक खासदार शिंदे गटात सहभागी होऊ शकतो. या खासदाराने ठाकरे गटात असताना देखील शिंदे गटाच्या बाजुने प्रतिज्ञापत्र दिलं आहे..

ठाकरे गटात उरलेल्या खासदारांची संख्या 5 इतकी होती. पण मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाकडून फक्त चारच खासदारांनी प्रतिज्ञापत्र दिले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचा तो पाचवा खासदार कोण याबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत. ज्यांनी प्रतिज्ञापत्र दिलं नाही.

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी ठाकरे गट, भाजप आणि निवडणूक आयोगावर देखील टीका केली. देशात आला लोकशाही उरली नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now