धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे पुरावे समोर! ‘या’ व्यक्तीने सातबारेच केले शेअर

On: December 24, 2024 5:35 PM
Dhananjay Munde & Valmik karad
---Advertisement---

Dhananjay Munde & Valmik karad l बीड जिल्ह्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यातील राजकारणात देखील उमटत आहेत. आता या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. मात्र या हत्या प्रकरणातील आरोपीला धनंजय मुंडे मदत करत असल्याचे खळबळजनक आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. परंतु, आता यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही कागदपत्रे एक्स अकाऊंटवर शेअर केली आहेत.

वाल्मिक कराडला सरकारमधूनच संरक्षण मिळतंय? :

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हे नाव सातत्याने पुढं येत आहे. त्यामुळे वाल्मिक कराड हे सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याची टीका देखील विरोधकांकडून होत आहे.

याशिवाय वाल्मिक कराडला सरकारमधूनच संरक्षण मिळत असल्याचा आरोप देखील वारंवार होत असून यामध्ये आमदार धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जात आहे. मात्र आमदार धनंजय मुंडेंनी यासंदर्भातील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Dhananjay Munde & Valmik karad l अंजली दमानिया यांनी केला मोठा दावा :

दरम्यान, अंजली दमानिया यांनी या हत्या प्रकरणात मोठा दावा करणारी काही महत्वाची कागदपत्र एक्स अकाऊंटवर शेअर केली आहेत. मात्र यावेळी ही कागदपत्रे म्हणजे जगमित्र शुगर्सचे 6 सातबारे असून त्यात धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांची संयुक्त मालकी असल्याचा दावा देखील अंजली दमानिया यांनी केला आहे.

यासोबतच अंजली दमानिया यांनी शेअर केलेल्या सातबाऱ्यांमध्ये देखील इतर काही नावांसोबत धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांचंही नावं स्पष्टपणे दिसत आहेत. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेली ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत असून त्या कागदपत्रांची देखील सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु आहे.

News Title – Anjali Damania Post Targeting Dhananjay Munde

महत्त्वाच्या बातम्या-

1500 की 2100; लाडक्या बहिणींच्या खात्यावर किती रुपये जमा होणार?

‘बंदोबस्त करणार’! मंत्री होताच नितेश राणेंनी दिला इशारा?

‘महाजन साहेब मलाही पक्षात घ्या’, ठाकरेंचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या वाटेवर?

शिवसेनेच्या नेत्यांवर पुन्हा अन्याय! मोठं कारण आलं समोर

उद्धव ठाकरे अ‍ॅक्शनमोडवर! लवकरच निवडणुकीचा धुराळा उडणार?

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now