Anant-Radhika Wedding | रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा काल 12 जुलैरोजी विवाह सोहळा पार पडला. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.संपूर्ण जगाचं लक्ष या लग्नाकडे लागलं होतं. जगभरातील व्यावसायिक, सेलिब्रिटी, गायक, राजकारणी व्यक्तींनी या विवाहसोहळ्यात हजेरी लावत अनंत-राधिकाला (Anant-Radhika Wedding) आशीर्वाद दिले.
लग्नानंतर नवविवाहीत जोडप्याचा पहिला फोटो समोर आला असून दोघेही प्रचंड सुंदर आणि खुश दिसत आहेत. त्यांचे हे फोटो आता तूफान व्हायरल झाले आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे सर्व विधी मध्यरात्री 12.30 च्या दरम्यान पूर्ण झाले.
अनंत-राधिका विवाहबंधनात अडकले
दोघांच्या लुकबद्दल बोलायचं झाल्यास, राधिका ही पारंपारिक गुजराती लाल आणि पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसली. तर, अनंत अंबानी लाल रंगाच्या शेरवानीमध्ये होता. लग्नासाठी राधिकाने डिझायनर अबू जानी संदीपच्या ‘पनेटर’ कलेक्शनमधील लेहेंगा परिधान केला होता.
अनंत आणि राधिकाचा लुक अत्यंत आकर्षक असा होता. दोघांचा लुक बघून त्यांच्यावरून नजरा हटणार नाहीत. इंटरनेटवर या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. लग्नाचा आनंद, उत्सुकता दोघांच्याही चेहऱ्यावर झळकत होती.
View this post on Instagram
‘या’ सेलेब्रिटींनी लावली हजेरी
दरम्यान, अनंत अंबानीच्या वरातीत बॉलीवुड मंडळी चांगलीच थिराकली. अमिताभ बच्चन व संपूर्ण बच्चन कुटुंब, बादशाह शाहरुख खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल-कतरिना कैफ, दीपिका पडूकोण, रणवीर सिंग, जॅकी श्रॉफ, सलमान खान, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, प्रियांका चोप्रा, अर्जुन कपूर, अनन्या पांडे, सारा अली खान आणि खुशी कपूर यांसारख्या स्टार्सनी लग्नाला हजेरी लावत ठुमके लगावले.
यासोबतच सुपरस्टार रजनीकांत, दिग्दर्शक एटली कुमार, धोनी, हार्दिक पांड्या, सचिन तेंडुलकर या क्रिकेटर्सनीही लग्नाला हजेरी लावली होती. तसेच सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे सीईओ हान जोंग, ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.स्टॅलिन आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील लग्नाला हजेरी लावली होती.
News Title- Anant-Radhika Wedding Photo
महत्वाच्या बातम्या-
…अन् हे संविधान वाचवणार?, मतं फुटल्याने प्रकाश आंबेडकरांची कॉँग्रेसवर टीका
आज ‘या’ राशीचे लोक होतील मालामाल!
“पंकजा मुंडे यांचा भाजपच्या नेत्यांनीच गेम…”, ‘या’ नेत्याच्या दाव्याने राज्यभर खळबळ
लग्न करायचं तर ‘अशा’ मुलींसोबतच करा; भाग्यही उजळेल आणि कायम आनंदी राहाल
महाराष्ट्रात श्रेयचोरांचा सुळसुळाट!, रोहित पवार आणि रवींद्र धंगेकरांचा उल्लेख






