अंबानींच्या कार्यक्रमात खाण्याच्या पदार्थात आढळलं असं काही, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

On: July 10, 2024 1:34 PM
Anant-Radhika Wedding Orry Finds Hair In Vada Pav
---Advertisement---

Anant-Radhika Wedding | भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी राधिका मर्चेंटसोबत येत्या 12 जुलै रोजी विवाह बंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाआधीच्या समारंभांना सुरुवात झाली असून मागच्या आठवड्यात बुधवारी मामेरू कार्यक्रम झाल्यानंतर शुक्रवारी संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या संगीत सोहळ्यात बॉलीवुडमधील अनेक दिग्गजांनी (Anant-Radhika Wedding) हजेरी लावली होती.

त्यानंतर कालच त्यांचा हळदीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळींनीही हजेरी लावली होती. हळदी समारंभातील अनेक सेलिब्रिटींचे फोटोही समोर आले आहेत. अशात सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर ओरहान अवत्रमणी ऊर्फ ऑरीने सोशल मीडियावर टाकलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.

ऑरीने शेअर केला व्हिडिओ

ऑरीने अंबानींच्या कार्यक्रमातील विविध व्लॉग्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पोर्तोफिनोमधील व्हिडीओमध्ये ऑरीने विविध फूड स्टॉल्स दाखवले असून पाहुण्यांसाठी खाण्यापिण्याची किती रेलचेल होती, ते त्याने व्हिडीओमध्ये दाखवलं. मात्र या व्हिडीओतील एका गोष्टीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अंबानींच्या कार्यक्रमात ऑरीला एका वडापावमध्ये चक्क केस आढळून आला होता.

ऑरीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पाहुणे एका स्टॉलवरून दुसऱ्या स्टॉलवर जात विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत असल्याचं दिसतंय. अशात ऑरी आणि त्याची मैत्रीण तानिया श्रॉफ हे एका वडापावच्या स्टॉलवर येऊन (Anant-Radhika Wedding) थांबतात. ‘पोर्तोफिनोमधील सर्वोत्कृष्ट वडापाव’ असं म्हणत तानिया आणि ऑरी या वडापावचा आस्वाद घेतात.

अंबानींच्या कार्यक्रमात ऑरीला वडापावमध्ये दिसला चक्क केस

पुढे वडापावचा एक घास खाल्ल्यानंतर तानिया म्हणते की “त्यात केस दिसतंय.” त्यानंतर ऑरीसुद्धा वडापावचा एक घास खातो. त्यावेळी तानिया म्हणते, “मला अजून एक घास खायचा होता पण त्यात केस आहे.” दोघांच्या या व्हिडिओने आता नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नेटकरी या व्हिडिओवर प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

दरम्यान, जून महिन्याच्या सुरुवातीला अंबानी कुटुंबीयांनी इटलीतील पोर्तोफिनोमध्ये एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये शाहरुख खान, जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे, शनाया कपूर असे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.याच पार्टीमध्ये ऑरीच्या वडापावमध्ये केस आढळून (Anant-Radhika Wedding) आला होता. त्याने याबाबतचा व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ आता तूफान व्हायरल होत आहे.

YouTube video player

News Title – Anant-Radhika Wedding Orry Finds Hair In Vada Pav

महत्वाच्या बातम्या-

“जरांगेंनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, त्यांना एकदाचं कळूनच जाईल”

आता मद्यधुंद होत गाडी चालवल्यास थेट लायसन होणार रद्द; ‘या’ शहरात घेण्यात आला मोठा निर्णय

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला खिंडार?; ‘त्या’ नेत्यांची पुन्हा शरद पवारांकडे वाटचाल?

“छगन भुजबळांना आवरा, ते महाराष्ट्र पेटवतायेत”; जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप

कार खरेदी करायचीयं? तर येत्या काळात तुमच्यासमोर आहेत ‘हे’ बेस्ट ऑप्शन

Join WhatsApp Group

Join Now