‘बजरंग सोनवणेंचा अजितदादांना फोन’, अमोल मिटकरींच्या दाव्याने खळबळ

On: June 11, 2024 8:38 PM
Amol Mitkari
---Advertisement---

Amol Mitkari | बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंना भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते बजरंग सोनवणेंना उमेदवारी दिली. या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे विजयी झाले. मात्र आशातच आता बजरंग सोनवणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे. मिटकरींच्या या ट्विटने मोठी खळबळ उडाली आहे.

“बीडमधील एका बप्पाचा अजितदादांना फोन आला”

बीडमधील एका बप्पाचा फोन अजितदादांना आला, असं अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हटलं आहे. अमोल मिटकरींच्या (Amol Mitkari) ट्विटने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजितदादांचा सर्वांना सोबत घेऊन जायचा स्वभाव असल्याने काही दिवसातच ट्रेलर दिसेल, असं सूचक विधान अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) केलं आहे.

लोकांना विकासकामं करायची असली तर जिंकून आल्यावर अजित पवारांची गरज लागते, साखर कारखान्यासंदर्भात विषय असल्याने त्यांचा फोन आल्याची शक्यता असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटवर आता बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी फोन करत असल्याचा संबंध येतो कुठे? ते संभ्रम का निर्माण करत आहेत? हे आता त्यांनाच विचारावं लागेल. हे महाराष्ट्रातील जनतेला कन्फ्युज का करत आहेत? राजकारणात वैयक्तिक विचार असतात. आता राजकारणात ते तुम्ही आणत आहात.

“मरेपर्यंत शरद पवारांसोबत राहणार”

मिटकरी हे डिरेक्टली आमदार झाले आहेत. त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी जनतेतून निवडून यावं. मी जिवंत असेपर्यंत शरद पवार साहेबांसोबत राहणार, असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

News Title – Amol Mitkari Tweet On Bajrang Sonawane Call To Ajit pawar

महत्त्वाच्या बातम्या

गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 ग्रॅम सोनं फक्त…

“..तर विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू”; नीट परीक्षेतील गोंधळावरून मनसेचा गंभीर इशारा

“लोक माझी लायकी विचारत होते, बीडच्या जनतेने माझी लायकी दाखवून दिली”

अखेर निलेश लंकेंनी इंग्रजी बोलून दाखवलीच; सुजय विखेंना सणसणीत टोला, पाहा Video

“स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखी…”, प्रितम मुंडेंची रक्षा खडसेंसाठी भावनिक पोस्ट चर्चेत

Join WhatsApp Group

Join Now