Ravan Mahaarti l आज दसऱ्याचा पवित्र सण आहे. श्रीरामाने रावणावर म्हणजे दृष्टप्रवृतींवर मिळविलेल्या विजयाची आठवण म्हणून दसऱ्याला रावणाचे दहन केले जाते. मात्र आता दसऱ्याच्या दिवशी अजित पवार गटाच्या एका आमदाराने चक्क रावणाची आरती करुन नवीन वादाला तोंड फोडले आहे. त्यामुळे आता हा आमदार चर्चेचा विषय ठरला आहे.
रावण दहनाच्या परंपरेवर बंदी घाला :
अकोला येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी हे प्रचंड चर्चेत आले आहेत. कारण आमदार अमोल मिटकरी यांनी चक्क रावणाची महाआरती केली आहे. तसेच आमदार मिटकरी हे आरती करुन न थांबता त्यांनी थेट रावण दहनाच्या परंपरेवर देखील बंदी घालण्याची मागणी केली आहे.
आमदार अमोल मिटकरी यांच्या या मागणीनंतर राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात रावणाच्या महाआरती वेळी आदिवासी समाज आणि गावकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर गेल्यावर्षी आमदार अमोल मिटकरी यांनी सांगोळा गावातील रावण मंदिराचा देखील जिर्णोद्धार करण्याची भूमिका मंडळी होती. मात्र त्यानंतर देशभरात मोठा गदारोळ निर्माण झाला होता.
Ravan Mahaarti l नवा वाद निर्माण होणार :
रावणाची पुजा दाक्षिणात्य राज्यात करत असल्याचं मिटकरी म्हणाले आहेत. परंतू आपल्या महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यात रावणाची देखील मनोभावे पूजा आणि आरती झालेली पाहून सर्वच नागरिकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.
मात्र आता सांगोळ्यात येऊन रावनदहनाच्या परंपरेवर देखील देशभरात बंदीची मागणी मिटकरी यांनी केली आहे. त्यामुळे आता आमदार मिटकरी यांच्या मागणीनंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
News Title – Amol Mitkari performed Mahaarti to Ravan
महत्त्वाच्या बातम्या-
मी राजकारणाला चिटकून बसणारी नाही…पंकजा मुंडे फक्त एकाच गोष्टीला घाबरते
“आमचा धक्का लागतो म्हणता, मग आता..”; जरांगे पाटलांची सरकारला केली थेट विचारणा!
आता उलथापालथ करावीच लागेल, पर्यायच नाही; मनोज जरांगे कडाकडले
घरात सुख-समृद्धीसाठी आज राशीनुसार ‘या’ वस्तु खरेदी करा!
पंकजा मुंडे यांचं जरांगेंच्या मेळाव्याबाबत सर्वात मोठं विधान!






