Amol Mitkari | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा नुकताच वर्धापन दिन सोहळा अहमदनगरला पार पडला. यावेळी नेत्यांनी नाव न घेता एकमेकांवर टीका केल्याचं दिसून आलं आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यात वाद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यामुळे आता रोहित पवार समर्थक आणि जयंत पाटील समर्थक सोशल मीडियावर आपापसात भिडल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये आता अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) उडी घेत जयंत पाटील यांची पाठराखण केली आहे. तर रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारणीसाठी जयंत पाटील साहेबांचं पक्ष उभारणीसाठी महत्त्वाचं योगदान आहे. जेव्हा शरद पवार साहेबांनी हा पक्ष उभारला तेव्हा, आर.आर. पाटील, अजितदादा पवार या सर्वांचा त्यात सिंहाचा वाटा आहे. अशातच आलेला एक युवक नवखा आमदार होतो आणि ज्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये पवार साहेब आणि जयंत पाटील यांनी फार कष्ट घेतले आहेत, असं मिटकरी म्हणाले.
“आयत्या बिळावर नागोबा”
आयत्या बिळावर नागोबा ही म्हण आहे त्याचप्रमाणे रोहित पवार कृत्य करत आहे. त्यातून त्यांचे हे बालिशपणाचे वक्तव्य पुढे येत आहे, अशी बोचरी टीका ही अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केली आहे.
नुसतं ट्विटरवर टिव टिव करण्यापेक्षा त्यांनी पवारसाहेबांना सांगितलं पाहिजे. यात काही चुकीचं वाटल्यास पवार साहेब निर्णय घेतील, असा सल्लाही अमोल मिटकरींनी दिला आहे. असं सांगूनही हा नेता असं वक्तव्य करतो याचा अर्थ रोहित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, असं मिटकरी म्हणालेत.
“जयंत पाटील अडचण ठरत आहेत”
अजित पवार हे पक्षात होते त्यावेळी देखील त्यांना असाच त्रास देण्यात आला होता. अजित पवारांनी काही वेगळी मागणी केली नाही. त्यांनी शरद पवारांना आपल्याकडे जबाबदारी द्यावी अशी मागणी केली. शरद पवारांचं वय हे 82 आहे. यामुळे पवारांना शारिरीक मर्यादा येत असल्याचं बोललं जात आहे. हीच अजित पवारांची भूमिका आहे. यामुळे आता अजित पवारांची जागा ही रोहित पवार घेऊ पाहत आहेत, त्यांना जयंत पाटील अडचण ठरत आहेत, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
News Title – Amol Mitkari On Rohit Pawar And Jayant Patil
महत्त्वाच्या बातम्या
सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी; नाराज छगन भुजबळ म्हणाले…
मोठी बातमी! एकाच दिवशी 5 बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलं
ग्राहकांना दिलासा! सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही मोठी घसरण
मोठी बातमी! मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला नवा अल्टीमेटम
दोन आमदारांचे राजीनामे, आणखी चार आमदार राजीनामे देण्याच्या तयारीत






