अमिताभ बच्चनने पत्नीबद्दल केलं अत्यंत मोठे विधान, म्हणाले, कायमच…

On: August 28, 2024 4:22 PM
Amitabh Bachchan
---Advertisement---

Amitabh Bachchan l बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अमिताभ बच्चनने त्यांच्या अभिनयाने त्यांचा काळ चांगलाच गाजवला आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चननी त्यांच्या करिअरमध्ये अनेक छोटे मोठे चढउतार पहिले आहेत. मात्र त्यांनी न डगमगता आपल्या अभिनयावर लक्ष केंद्रित केले.अमिताभ यांच्यावर असा एक काळ आला होता की, चित्रपटसृष्टीतील कोणतीही अभिनेत्री त्यांच्यासोबत चित्रपट करण्यास तयार नव्हती. मात्र ज्या चित्रपटासाठी अभिनेत्रींनी नकार दिला आणि तोच चित्रपट प्रचंड सुपरहिट ठरला.

अमिताभ बच्चन यांचं विधान चर्चेत :

अशातच आता सुपरस्टार अमिताभ बच्चन हे “काैन बनेगा करोडपती” चा नवीन सीजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे या सीजनबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ बघायला मिळतं आहे. या शो दरम्यान अमिताभ बच्चन यांनी एक मोठं भाष्य केलं आहे.

काैन बनेगा करोडपतीच्या मंचावर हॉट सीटवर हर्षित भूटानी हे बसले होते. त्यावेळी हर्षित म्हणाला की, इथे बसण्यासाठी मी खूप दिवसांपासून प्रचंड प्रयत्न करत होतो आणि आज अखेर माझे ते स्वप्न पुर्ण देखील झाले आहे. यानंतर हर्षित म्हणाला की, माझ्यामध्ये आणि माझ्या पत्नीमध्ये एक चॅलेंज लागले होते की, या हॉटसीटवर सर्वात अगोदर कोण पोहोचणार. यावर हर्षितने पत्नीला म्हटले की, बघ तुझ्या अगोदर या सीटवर मी इथे पोहोचलो.

Amitabh Bachchan l पत्नीसमोर नेहमीच हार मानली पाहिजे :

या भाष्यावर हर्षितची पत्नी म्हणाली की, मीच यासाठीच तुला ट्रेनिंग दिले आहे. मात्र या दोघांमधील बोलणे ऐकून अमिताभ बच्चन हर्षितला म्हटले की, आपण पत्नीसमोर नेहमीच हार मानली पाहिजे. कारण तीच नेहमी बरोबर असते. त्यानंतर सुपरस्टार अमिताभ बच्चन म्हणाले की, आतमधील गोष्ट तुम्हाला तर माहिती आहे आणि मला पण…

अशातच आता अमिताभ बच्चन यांच्या याच विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे. यावरून अमिताभ बच्चन यांच्या घरी जया बच्चन याच बॉस आहेत हे दिसून येत आहे. तसेच यापूर्वी देखील अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांनी सांगितले होते. यामुळेच अमिताभ बच्चन हे पत्नीच नेहमी बरोबर असल्याचे म्हणतात.

News Title : Amitabh Bachchan Big Statement On Jaya Bachchan

महत्त्वाच्या बातम्या-

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवा ही 3 झाडे, पडेल पैशांचा पाऊस

‘या’ अभिनेत्रीसाठी स्वतःच्या मुलाने अजय देवगणच्या कानाखाली काढला जाळ!

फडवणीस शिवरायांचे दुश्मन…; मनोज जरांगे नेमके काय म्हणाले

“आमच्या नेत्याच्या केसाला जरी धक्का..”; सिंधुदुर्गातील राड्यावर सुप्रिया सुळे संतापल्या

…तर यांना घरात रात्रभर ठेचून एकेकाला मारुन टाकेन; नारायण राणेंची माविआला धमकी

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now