मराठा आंदोलकांचा ताफा थेट ‘मातोश्री’वर; अंबादास दानवे म्हणाले, ही भाजपची माणसं..

On: July 30, 2024 1:22 PM
Maratha Reservation
---Advertisement---

Ambadas Danve | मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भूमिका जाहीर करावी, अन्यथा सरकारने सरसकट आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. अशात आज 30 जुलै रोजी मराठा आंदोलकांचा एक गट थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेले मातोश्रीवर दाखल झाला.

मराठा आंदोलकांच्या या गटाने आज रमेश केरे पाटील (Ramesh Kere Patil) यांच्या नेतृत्त्वाखाली उद्धव ठाकरे यांना जाब विचारण्यासाठी मातोश्रीवर धडक मारली. आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, असा पवित्रा या मराठा आंदोलकांनी घेतला. आंदोलकांकडून यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली.

मराठा आंदोलकांकडून मातोश्रीबाहेर घोषणाबाजी

त्याचवेळी उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे मातोश्रीबाहेर आले आणि त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला. मराठा आंदोलकांनी मातोश्रीवर धडक दिल्याचे समजताच अंबादास दानवे तातडीने त्याठिकाणी पोहोचले.

त्यापूर्वी दानवे यांनी मातोश्रीवर ज्यांच्या नेतृ्त्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला आहे ते रमेश केरे पाटील हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चेंबरमध्ये काही दिवसांपूर्वी दिसले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यानंतर त्यांनी मातोश्रीबाहेर जमलेल्या मराठा आंदोलकांच्या जमावाला थेट सवाल केले.

मराठा आंदोलकांना अंबादास दानवे भिडले

तु्म्ही कोणाच्या सांगण्यावरुन इकडे आलात, मला माहिती आहे, असा थेट हल्ला अंबादास दानवे यांनी चढवला. त्यावर जमावाने आपली बाजू मांडायला सुरुवात केली. आम्ही फक्त उद्धव ठाकरेंच्या घरासमोर नव्हे तर शरद पवार, नाना पटोले आणि मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरही आंदोलन करणार आहोत, असे आंदोलकांनी सांगितले.

यानंतर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे याबाबत काय करणार? तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जायला पाहिजे. तुम्ही उद्धव ठाकरे यांची वेळ घेऊन याठिकाणी आले पाहिजे होते. फक्त चार-पाच जणांनी उद्धव ठाकरेंना भेटायला पाहिजे होते. मी साहेबांना भेटीबाबत विचारतो. पण तुम्ही कोणाच्या सांगण्यावरुन याठिकाणी आला असाल तर हे कळालं तर उद्धव साहेब तुम्हाला भेटणार नाहीत, असा दमच अंबादास दानवे यांनी दिला.

News Title –   Ambadas Danve face maratha reservation mob gather

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! अभिनेता शाहरुख खानची तब्येत बिघडली, प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

रामदेव बाबांना हायकोर्टाचा दणका! ‘त्या’ प्रकरणी पतंजली आयुर्वेदला मोठा दंड

“एकनाथ शिंदे मौलानाचा वेश धारण करून…”; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

अश्लीलतेचा कळस! दिल्ली मेट्रोत तरुणीने केली चक्क प्रग्नेन्सी टेस्ट, Video व्हायरल

“पुणे बरबाद व्हायला..”; राज ठाकरेंचा राज्य सरकारवर संताप

Join WhatsApp Group

Join Now