पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यावर अजितदादांच्या ‘या’ आमदाराचा प्रभाव; प्रांताधिकाऱ्याने केला गंभीर आरोप

On: May 31, 2024 11:40 AM
Pune Collector Suhas Diwase
---Advertisement---

Pune News l सध्या देशाचं लक्ष हे लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच राज्याचं केंद्रस्थान असलेल्या पुण्यातून एक महत्वाची घडामोड घडली आहे. पुण्याचे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे हे एका वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

पुण्याचे जिल्ह्याधिकारी अडचणीत :

पुण्याचे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असल्याचा आरोप खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी केली आहे. त्यामुळे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे यांची मतमोजणीआधी त्यांची बदली करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावाखाली काम करत आहेत असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. मात्र त्यांनी आमदारांचे थेट नाव घेतले नाही. परंतु खेड- आळंदी मतदार संघात अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते हे आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांच्या प्रभावातून जिल्हाधिकारी सुहास दिवसे काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आहे.

Pune News l जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात ठाण मांडण्यासाठी राजकीय हितसंबंचा घेतला आधार :

जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे अनेक वर्षे कृषी आयुक्त, पी एम आर डी ए चे संचालक, क्रिडा आयुक्त अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून बसले आहेत. त्यासाठी दिवसे यांनी त्यांच्या राजकीय हितसंबंचा आधार घेतला असल्याचं बोललं जात आहे.

तसेच सुहास दिवसे हे निवडणूकीच्या काळात सतत खेड व आळंदीच्या आमदारांना भेटत होत असल्याचं आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या आमदारांचा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या सुरुवातीपासून पाठिंबा राहिला आहे. आगामी काळातील विधानसभा निवडणुका स्वतंत्र वातावरणात पार पाडण्यासाठी सुहास दिवसे यांची बदली होणे आवश्यक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता जोगेंद्र कट्यारे यांच्या पत्रानंतर निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहण देखील महत्त्वाचे असणार आहे.

News Title – Allegation against Pune Collector Suhas Diwase

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! शहरातील ‘या’ ठिकाणच्या वाहतुकीत बदल, असा असणार पर्यायी मार्ग

इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा फॉर्मुला ठरला!… तर यांची वर्णी लागणार

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; रेल्वेने प्रवास करत असाल तर थांबा…अन्यथा

आज या राशीच्या व्यक्तींना धन प्राप्तीचे योग जुळून येतील

सौरव गांगुलीचा गौतम गंभीरला विरोध?; सौरव गांगुलीच्या पोस्टने खळबळ

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now