अक्षय शिंदेच्या पोस्टमार्टमचा व्हिडीओ रेकॉर्डिंगमधून खुलासा होणार?

On: September 24, 2024 3:12 PM
Akshay Shinde Encounter
---Advertisement---

Akshay Shinde Postmortem l गेल्या काही दिवसांपूर्वी बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा काल (23 सप्टें) सायंकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अक्षयच्या आई वडिलांनी पोलिसांवर अनेक आरोप केले आहेत. अशातच आता अक्षय शिंदेच्या मृतदेहावर जेजे रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. परंतु शवविच्छेदनापूर्वी (Akshay Shinde Postmortem) मृत अक्षयच्या बॉडीचा एक्सरे देखील करण्यात येणार आहे.

पोस्टमार्टम करताना व्हिडीओ रेकॉर्डिंग करणार :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, अक्षय शिंदे याला दुसऱ्या एका गुन्ह्याप्रकरणी पोलिस तळोजा कारागृहातून पोलिस व्हॅनमधून घेऊन येत असताना त्याने एका पोलिस अधिकाऱ्याकडील पिस्तूल हिसकावून पोलिसांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या आहेत. या गोळीबारात अक्षय याचा मृत्यू झाला आहे. तसेच अक्षयने झाडलेल्या गोळीने एक पोलिस अधिकारी देखील जखमी झाला आहे.

अशातच आता बदलापूर अत्याचार प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदे याच्या बॉडीचा एक्सरे करण्यात येणार आहे. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात येणार आहे. तसेच आता तीन डॉक्टरांच्या उपस्थितीत अक्षयचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अक्षय शिंदेच्या पोस्टमार्टमचे व्हिडीओ रेकॉर्डिंग देखील करण्यात येणार आहे. तसेच पोस्टमार्टम झाल्यानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार आहे. (Akshay Shinde Postmortem)

Akshay Shinde Postmortem l डॉक्टरांनी दिली माहिती :

याशिवाय पोस्टमार्टम हे जे.जे. हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे. यासंदर्भात जे.जे. हॉस्पिटलच्या डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या की, मुंबई पोलिसांनी अक्षय शिंदेचे शव हे जेजे रुग्णालयात आणले आहे. तसेच आम्हाला पेपर मिळताच आम्ही पोस्टमार्टम सुरू करणार आहोत.

पोस्टमार्टम करताना तीन डॉक्टर तेथे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सरकारने घालून दिलेल्या नियमावलीनुसार पोस्टमार्टमचे व्हिडीओ रेकॉर्डिंग देखील करण्यात येणार आहे. त्यानंतर मृतदेह हा पोलिसांच्या ताब्यात देणार आहे.

News Title : Akshay Shinde Postmortem Video Recording

महत्वाच्या बातम्या –

बाजारात ‘या’ मोबाईल कंपनीने उडवली खळबळ; 5000GB डेटा मिळणार

अक्षय शिंदेवर गोळी झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा FIR मध्ये मोठा खुलासा!

सिद्धीविनायक मंदिरात घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर सगळीकडे खळबळ!

अक्षय शिंदेचा पोलिसांसोबतचा व्हिडीओ आला समोर!

अक्षयचं एन्काऊंटर कुठे झालं?, फॉरेन्सिक टीमला पोलीस व्हॅनमध्ये सापडला महत्त्वाचा पुरावा!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now