Akshay Shinde Encounter | बदलापूर लैंगिक प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर (Encounter) झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि अक्षय यांची झटापट झाल्यानंतर अक्षयला पोलिसांकडून गोळी झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता अक्षयच्या आई- वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षय शिंदेला मी दुपारी भेटून आलो. अक्षयला पैसे घेऊन मारुन टाकलं आहे. त्याला पिचकारीची बंदूक माहित नाही. तो फटाक्याला घाबरतो मग तो काय पोलिसांची बंदूक घेऊन फायर कसं करेल?. पोलिसांनी आम्हाला काहीही सांगितलं नाही. आता मी बातमी पाहिली तेव्हा मला कळालं, असा आरोप अक्षय शिंदेच्या वडिलांनी केली आहे. माझा पोरगा भोळाय, तो फटाक्याला घाबरतो, गोळी कशी चालवेल, त्याला पैसे देऊन मारलं, असं अक्षयच्या आईने म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
अक्षय शिंदे याने पोलीस अधिकाऱ्याच्या पायावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. या प्रकरणात अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांकडून अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. बदलापूरमधील या घटनेनं लोकं रस्त्यावर उतरले होते. लोकांनी मोठं आंदोलन केलं. रेल्वे गाड्या रोखून धरल्या होत्या. आरोपीला फाशी देण्याची मागणी लोकांनी केली होती. त्याच्यावर दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.
एपीआय निलेश मोरे यांच्यावर अक्षय शिंदे याने गोळीबार केल्याची माहिती आहे. ज्यामध्ये ते जखमी झाले आहेत. बदलापूर पोलिसांकडून क्राइम ब्रँच अक्षय शिंदेचा ताबा घेत असताना ही घटना घडली.
महत्त्वाच्या बातम्या-
एन्काऊंटरमध्ये आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू, आरोपीबद्दल मोठी माहिती समोर!
मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एनकाऊंटर?
सर्वात मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील आरोपीने स्वत:वरच झाडून घेतली गोळी
कुणबीच्या तीन पोटजातींचा OBC मध्ये समावेश; मंत्रिमंडळाने घेतले 24 मोठे निर्णय
PM किसान योजनेचा 18 वा हप्ता कधी जमा होणार? महत्वाची माहिती समोर






