Akshay Shinde | बदलापूर येथील शाळेत केलेल्या अत्याचार प्रकरणाआधी आरोपी अक्षय शिंचे याच्यावर अन्य दोन बलात्काराचे गुन्हे दाखल होते. बदलापूर प्रकरणात न्यायालयीन कोठडीतून त्याची पोलिसांनी कस्टडी मिळवली होती. दरम्यान, यावेळी अक्षयने स्वतःवर गोळीबार करत आपलं आयुष्य संपवल्याचं म्हटलं जात असताना आता पोलिसांनी अक्षयचा एन्काऊंटर केल्याचं समोर आलं आहे. मात्र, आता या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षयच्या आईने एक मोठा खुलासा केला आहे.
काय म्हणाली अक्षयची आई-
अक्षयला (Akshay Shinde) ट्रान्झिट रिमांडसाठी बदलापूरला घेऊन जात असताना अक्षयने पोलिसांवर गोळीबार केला. मात्र, अक्षयने आधी पोलिसांच्या पायावर गोळी झाडली, त्यानंतर पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षयवर गोळ्या झाडल्याचं म्हटलं जात असताना अक्षयच्या आईने एक खुलासा केला आहे. अक्षयची आई म्हणाली की, अक्षय शिंदेला पैसे घेऊन मारुन टाकलं आहे. त्याला पिचकारीची बंदूक माहित नाही. मग तो काय पोलिसांची बंदूक घेऊन फायर करणार. पोलिसांनी आम्हाला काहीही सांगितलं नाही. आता मी बातमी पाहिली तेव्हा मला कळालं.
नेमकं काय घडलं?
अक्षय शिंदे याने पोलीस अधिकाऱ्याच्या पायावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. या प्रकरणात अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांकडून अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. बदलापूरमधील या घटनेनं लोकं रस्त्यावर उतरले होते. लोकांनी मोठं आंदोलन केलं. रेल्वे गाड्या रोखून धरल्या होत्या. आरोपीला फाशी देण्याची मागणी लोकांनी केली होती. त्याच्यावर दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.
News Title : akshay shinde mother talks about encounter
महत्त्वाच्या बातम्या-
“माझा पोरगा भोळाय, तो फटाक्याला घाबरतो, गोळी कशी चालवेल, त्याला पैसे देऊन मारलं”
एन्काऊंटरमध्ये आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू, आरोपीबद्दल मोठी माहिती समोर!
मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एनकाऊंटर?
सर्वात मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील आरोपीने स्वत:वरच झाडून घेतली गोळी
कुणबीच्या तीन पोटजातींचा OBC मध्ये समावेश; मंत्रिमंडळाने घेतले 24 मोठे निर्णय






