Akshay Shinde Encounter | बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा काल 23 सप्टेंबररोजी पोलिसांनी एन्काऊंटर केला. पोलिसांवर त्याने आधी हल्ला केला. त्यामुळे पोलिसांनी बचावासाठी अक्षयवर गोळी झाडली, यात त्याचा मृत्यू झालाय. या प्रकरणी आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. (Akshay Shinde Encounter)
अक्षयचा एन्काऊंटर नेमका कुठे आणि कधी झाला?, याबाबत प्रश्न केले जात होते. आता याबद्दल मोठी माहिती उघड झाली आहे. अक्षयचा एन्काऊंटर पोलीस व्हॅनमध्येच झाल्याचं स्पष्ट झालं आहे. फॉरेन्सिक लॅबच्या टीमने आज या व्हॅनची पाहणी केली. त्यात पोलिसांना बंदुकीच्या पुंगळ्या आढळून आल्या आहेत. आज फॉरेन्सिक टीमने तपास केला असता त्यांना व्हॅनमध्ये बंदुकीच्या पुंगळ्या सापडल्या आहेत.
पोलिस व्हॅनमध्ये फॉरेन्सिक टीमला काय आढळलं?
चकमकीदरम्यान अक्षय शिंदे याने पोलिसांवर तीन गोळ्या झाडल्या होत्या. तर एक गोळी पीआय संजय शिंदे यांनी लागली. या गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या फॉरेन्सिक टीमला सापडल्या आहेत. यासोबतच फॉरेन्सिक टीमने पोलीस व्हॅनमधून रक्ताचे नमुने देखील घेतले आहेत. यातून ही घटना पोलिस व्हॅनमध्येच झाली असल्याचं म्हटलं जातंय.
दरम्यान, अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर नंतर विरोधी गटाकडून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर, दुसरीकडे बदलापूरमधील महिलांनी बदलापूर स्थानकाबाहेर फटाके वाजवून जल्लोष केलाय. भविष्यात अशा घटना कमी होतील, अशी आशा महिलांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या राज्यभर याचीच चर्चा रंगली आहे. (Akshay Shinde Encounter)
मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी अक्षयचा एन्काऊंटर?
विरोधी गटाकडून अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी केला गेला काय?, असा प्रश्न केला जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “पोलिसांच्या कमरेवरची बंदुक हिसकावणार. ती लॉक झालेली बंदुक फायर करणार हे कोणाला पटेल का? हे कोणाला पटू शकतं का? संडास साफ करणारा पोरगा कधीपासून बंदुक चालवायला लागला?”,असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील या प्रकरणी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आरोपी अक्षयला कोणत्या चौकशीसाठी नेलं जात होतं? पोलिसांच्या मांडीला गोळी कशी लागली? कुणाला तरी वाचवण्यासाठी आरोपीचा बळी घेतला का?, असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी शंका उपस्थित केली आहे. (Akshay Shinde Encounter)
News Title : Akshay Shinde Encounter Forensic team investigation
महत्वाच्या बातम्या –
अक्षय शिंदेवर गोळी चालवणारा पोलीस ऑफीसर कोण?, महत्त्वाचं कनेक्शन समोर
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट!
“अक्षयचा एन्काऊंटर पैसे घेऊन केला, त्याच्या खिशात..”, वडिलांचा खळबळजनक आरोप
बिग बॉस मराठी 5 चा महाअंतिम सोहळा ‘या’ दिवशी पार पडणार!
“मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी अक्षयचा एन्काऊंटर”; संजय राऊत यांचा गंभीर आरोप






