अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट!

On: September 24, 2024 11:52 AM
Akshay Shinde Encounter
---Advertisement---

Akshay Shinde Encounter | महाराष्ट्रातील बदलापूर येथील एका नामांकित शाळेतील दोन चिमूरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना अक्षयने पोलिसांकडे असलेली सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचून तीन गोळ्या फायर केल्या. नंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळी झाडली, यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. (Akshay Shinde Encounter )

अक्षयचा एन्काऊंटर पोलीस व्हॅनमध्येच झाल्याचं स्पष्ट झालं आहे. फॉरेन्सिक लॅबच्या टीमने आज या व्हॅनची पाहणी केली. त्यात पोलिसांना बंदुकीच्या पुंगळ्या आढळून आल्या आहेत. आज फॉरेन्सिक टीमने तपास केला असता त्यांना व्हॅनमध्ये बंदुकीच्या पुंगळ्या सापडल्या आहेत.

फॉरेन्सिक टीमला मिळाली महत्वाची माहिती

चकमकीदरम्यान अक्षय शिंदे याने तीन गोळ्या झाडल्या होत्या. तर एक गोळी पीआय संजय शिंदे यांनी लागली. या गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या फॉरेन्सिक टीमला सापडल्या आहेत. यासोबतच फॉरेन्सिक टीमने पोलीस व्हॅनमधून रक्ताचे नमुने देखील घेतले आहेत.यातून ही घटना पोलिस व्हॅनमध्येच झाली असल्याचं म्हटलं जातंय.

दरम्यान, अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर नंतर विरोधी गटाकडून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर, दुसरीकडे बदलापूरमधील महिलांनी बदलापूर स्थानकाबाहेर फटाके वाजवून जल्लोष केलाय. भविष्यात अशा घटना कमी होतील, अशी आशा महिलांनी व्यक्त केली आहे. राज्यभर या एन्काऊंटरची आता चर्चा रंगली आहे. (Akshay Shinde Encounter )

विरोधकांकडून एन्काऊंटर प्रकरणी सवाल

या घटनेनंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी महायुतीला काही प्रश्न विचारले आहेत. विरोधकांच्या टीकेला आता आमदार विश्वनाथ भोईर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अक्षय शिंदे या नराधमाच्या एन्काऊंटरप्रकरणी विरोधकांनी थोडेतरी तारतम्य बाळगले पाहिजे, अशा शब्दांत भोईर यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. (Akshay Shinde Encounter )

बदलापूरमध्ये जेव्हा ही घटना घडली, तेव्हा हेच विरोधक या नराधमाला फाशी देण्याची मागणी करत होते. आज अक्षय शिंदे हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात मारला गेल्यानंतर हेच विरोधक राज्य शासन आणि पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात कसे काय उभे करत आहेत?, असा सवाल भोईर यांनी केला आहे.

News Title : Akshay Shinde Encounter big update

महत्वाच्या बातम्या –

“अक्षयचा एन्काऊंटर पैसे घेऊन केला, त्याच्या खिशात..”, वडिलांचा खळबळजनक आरोप

बिग बॉस मराठी 5 चा महाअंतिम सोहळा ‘या’ दिवशी पार पडणार!

“मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी अक्षयचा एन्काऊंटर”; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

एन्काऊंटरआधी अक्षयचे शेवटचे शब्द काय होते?, आईने केला मोठा खुलासा

“मृतदेह ताब्यात घेणार नाही..”; अक्षय शिंदेच्या आईचे पोलिसांवरच गंभीर आरोप

Join WhatsApp Group

Join Now