Akshay Shinde l महाराष्ट्रातील बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी चकमकीत मृत्यू झाला. यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून गोळीबार केला आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अशातच त्याचवेळी पोलिसांनी स्वरक्षणार्थ त्याच्यावर गोळीबार केला. मात्र त्या गोळीबारात अक्षय शिंदे जागीच ठार झाला.
प्रत्येकाचे वेगवेगळे दावे :
मृत आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर हा पोलीस व्हॅनमध्येच झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. कारण फॉरेन्सिक लॅबच्या टीमने आज या व्हॅनची देखील तपासणी केली असता, त्यामध्ये पोलिसांना बंदुकीच्या गोळ्यांच्या रिकाम्या शेल्स देखील आढळून आल्या आहेत. यावेळी अक्षय आणि पोलिसांच्या चकमकी दरम्यान अक्षय शिंदे या आरोपून पोलिसांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या होत्या. तर यावेळी एक गोळी ही पीआय संजय शिंदे यांनी लागली.
मात्र या गोळ्यांच्या रिकाम्या शेल्स फॉरेन्सिक टीमला आता मिळाल्या आहेत. त्यामुळे फॉरेन्सिक टीमने पोलीस व्हॅनमधून रक्ताचे काही नमुने देखील तपासणीसाठी घेतले आहेत. यातून ही घटना पोलिस व्हॅनमध्येच झाली असल्याचं स्प्ष्टपणे सांगण्यात येत आहे. मात्र या घटनेची माहिती प्रत्येकाकडून वेगवेगळी येत असल्याने नक्की हा प्रकार खरा कि खोटा असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Akshay Shinde l अक्षय शिंदे मृत्यू प्रकरण CID कडे सोपवणार :
बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरचा तपास लवकरच सीआयडीकडे जाऊ शकतो. याबाबत ठाणे पोलिसांनी सीआयडीला पत्र दिले आहे. आता मुंब्रा पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्याचा ताबा सीआयडी घेऊ शकते असे ठाणे पोलिसांचे म्हणणे आहे.
ठाणे पोलिसांनी सीआयडीला पत्र लिहून अक्षय शिंदेच्या मृत्यूच्या प्रकरणाचा तपास कोठडीतील मृत्यूच्या तपासाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्याची विनंती केली आहे. मुंब्रा पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्याची लवकरच सीआयडी ताब्यात घेणार असल्याचे ठाणे पोलिसांचे म्हणणे आहे.
News Title : Akshay Shinde Encounter
महत्वाच्या बातम्या –
अक्षय शिंदेच्या पोस्टमार्टमचा व्हिडीओ रेकॉर्डिंगमधून खुलासा होणार?
बाजारात ‘या’ मोबाईल कंपनीने उडवली खळबळ; 5000GB डेटा मिळणार
अक्षय शिंदेवर गोळी झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा FIR मध्ये मोठा खुलासा!
सिद्धीविनायक मंदिरात घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर सगळीकडे खळबळ!






