अक्षय कुमारचे तब्बल ‘इतक्या’ अभिनेत्रींसोबत होतं अफेअर, हिने तर रंगेहातच पकडलं होतं?

On: August 31, 2024 12:55 PM
Akshay Kumar
---Advertisement---

Akshay Kumar l बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे नाव अनेक सिनेसृष्टीतील अभिनेत्रींसोबत जोडले जात होते. कारण अक्षय कुमारचे अफेअर बऱ्याच अभिनेत्रींसोबत असल्याचे वारंवार सांगण्यात येते. एकाच वेळी अक्षयचे अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर असल्याने एका अभिनेत्रीने तर त्याला रंगेहातच पकडले असल्याचे बोलले जाते. अक्षय कुमार हा त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या प्रेमप्रकरणांमुळे आणि फ्लर्टिंगमुळे देखील नेहमीच चर्चेत असायचा.

या अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा :

अक्षय कुमारचे लग्नाआधी अफेअर हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत होते. त्यामध्ये रेखा, रवीना टंडन, आयशा झुल्का, सुष्मिता सेन, पूजा बत्रा, शिल्पा शेट्टी आणि प्रियांका चोप्रा यांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये अक्षयचे अफेअर हे शिल्पा शेट्टी आणि रवीना टंडन सोबत बरेच पुढे गेले होते.

सर्वात महत्वाचं म्हणजे बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमारची अभिनेत्री रवीनाशी एंगेजमेंट देखील झाली होती असं म्हटले जाते. मात्र अभिनेत्री रवीनाने अक्षयला इतर हिरोइन्ससोबत रंगेहात पकडले आणि त्यानंतर त्यांची एंगेजमेंट मोडली असल्याचं बोललं जात आहे. मात्र आत्ता अक्षय कुमार हा ट्विंकल खन्नासोबतच्या वैवाहिक जीवनात खूपच आनंदी आहे.

Akshay Kumar l अक्षयला ‘या’ अभिनेत्रींसोबत रंगेहात पकडले :

पण एक वेळ अशी होती जेव्हा अक्षयवर अनेक सौंदर्यवतींचे मन होते. रवीना टंडनसोबतच्या त्याच्या अफेअरची आज देखील सिनेसृष्टीत चर्चा होते. असे म्हटले जात आहे की, रवीना आणि अक्षयची एंगेजमेंट झाली होती त्यावेळी अक्षय हा रेखाला डेट करत होता. या दोघांनी सोबत देखील चित्रपटात काम केले होते, जे की त्या चित्रपटात त्यांचे अनेक इंटिमेट सीन होते, त्या सीन्सवरुन देखील रवीना अक्षयवर कायम रागावायची. मात्र एक दिवस असा आला की रवीनाने अक्षय कुमार आणि रेखाला रंगेहात पकडले होते.

रेखाच नाही तर रवीनाने अक्षय कुमारला सुष्मिता सेनसोबत देखील रंगेहात पकडले होते. स्वतः रवीनाने तिच्या एका मुलाखतीत या गोष्टीचा उल्लेख केला होता आणि म्हणाली की , “मी अक्षयला सुष्मिता आणि रेखा या अभिनेत्रीं सोबत रंगेहात पकडले होते.” त्यानंतर रवीना म्हणाली होती की, निष्ठा तिच्यासाठी प्रचंड महत्त्वाची आहे, परंतु अक्षयला त्याच्याशी काही देणेघेणे नव्हते. त्यावेळी प्रत्येक वेळी मी त्याला माफ करेन अशी अक्षयची अपेक्षा होती. मात्र ती गोष्ट मी तीन वर्षे हे सहन केली आहे.

News Title-  Akshay Kumar affair with many actress

महत्त्वाच्या बातम्या –

बापरे! माजी गृहराज्यमंत्र्याचा मुलगा चालवतोय हुक्का पार्लर; मिळालं मोठं घबाड

10 ग्रॅम सोन्यासाठी आता मोजा फक्त ‘इतके’ रुपये; जाणून घ्या लेटेस्ट दर

राज्यातील लेकीही होणार मालामाल; ‘या’ योजनेतून लेकींना मिळणार दणकून पैसे

वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी! पेट्रोल-डिझेलच्या किमती घसरल्या?

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याची भाजपमध्ये एंट्री

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now