अजितदादांचा ‘पॉवर’ गेम! ऐन निवडणुकीत भाजपला मोठा धक्का

On: December 22, 2025 5:19 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar | नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुका पार पडताच आता महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या शहरात भाजपाला हादरा बसला असून, येथील ताकदवान नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील महापालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

नेमका कोणाचा पक्षप्रवेश झाला? :

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील (Pimpri chinchwad mahanarpalika) भाजपाचे माजी नगरसेवक संदीप वाघीरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यामुळे हा प्रवेश केवळ स्थानिक नाही, तर भाजपावर केलेला थेट राजकीय पलटवार असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी भाजपात प्रवेश केला होता. संजोग वाघेरे यांचा भाजप प्रवेश संदीप वाघीरे यांना मान्य नव्हता. त्यामुळे भाजपातील अंतर्गत नाराजी उफाळून आली आणि अखेर संदीप वाघीरे यांनी भाजपाला रामराम ठोकत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Ajit Pawar | संदीप वाघीरे कोण आहेत? :

संदीप बाळकृष्ण वाघीरे हे 2017 साली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. ते पेशाने बांधकाम व्यावसायिक असून शहरातील प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या आणि संजोग वाघेरे यांच्यात राजकीय वैर असून, लोकसभा निवडणुकीदरम्यानही दोघे वेगवेगळ्या बाजूंनी सक्रिय होते.

लोकसभा निवडणुकीत संजोग वाघेरे ठाकरे गटाकडून उमेदवार होते, तर संदीप वाघीरे यांनी शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करत पिंपरी गावातून मोठे मताधिक्य मिळवून दिले होते. त्यामुळे संजोग वाघेरे भाजपात गेल्यानंतर संदीप वाघीरे यांची नाराजी अधिकच वाढली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये ताकद वाढवत महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजपाला जोरदार शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

News Title: Ajit Pawar’s Big Political Move Shakes BJP Ahead of Municipal Elections

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now