अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी अजितदादांचा मोठा निर्णय, घोषणेनंतर आता ‘ही’ अट केली रद्द

On: September 24, 2025 9:20 AM
Ajit Pawar  
---Advertisement---

Ajit Pawar | मराठवाडा आणि विदर्भातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकं पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी शेतकरी हताश झाले आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून तातडीने मदतीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. त्याचबरोबर मंत्री पंकजा मुंडे यांनी जालना जिल्ह्यातील बाधित गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. (Ajit Pawar farmers announcement)

अजित पवारांची मोठी घोषणा :

धाराशिव (Dharashiv) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील पाहणीदरम्यान अजित पवारांनी (Ajit Pawar) शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. करमाळा तालुक्यातील कोरटी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की निधीची कोणतीही चिंता नाही, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पंचनाम्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार असून मदतीसाठीची ६५ मिमी पावसाची अट रद्द केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळवताना अडचणी येणार नाहीत.

यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) देवगाव, वालवड आणि पारगाव अशा अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती घेतली आणि कांदा तसेच इतर पिकांच्या हानीबद्दल थेट शेतकऱ्यांकडून परिस्थिती जाणून घेतली. “शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही शक्य आहे ते करण्यात येईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. (Marathwada Vidarbha heavy rain)

Ajit Pawar | पंकजा मुंडेंची पाहणी :

दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी परतूर तालुक्यातील गोळेगाव गावाला भेट दिली. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे गावाला मोठा वेढा बसला होता. यामुळे दोन ते अडीच हजार नागरिकांना मध्यरात्रीच शेजारच्या लोणी गावात स्थलांतर करावे लागले. पंकजा मुंडे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांची अडचण समजून घेतली आणि नुकसानाची माहिती घेतली.

राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. मात्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या तातडीच्या मदतीमुळे आणि अटी शिथिल केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

News Title: Ajit Pawar’s Big Announcement for Rain-Hit Farmers: 65 mm Condition Cancelled

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now