शरद पवार आणि राहुल गांधींनंतर आता अजित पवारही करणार पायीवारी!

Ajit Pawar | पाऊले चालती पंढरीची वाट.. सुखी संसाराची सोडूनिया गाठ..या गाण्याच्या ओळी ऐकताच आपल्याला संतांच्या, महात्मांच्या आणि पांडुरंगाच्या वारीची आठवण येते. माऊली माऊली… म्हणत लाखो वारकरी पंढरपुरच्या दिशेने निघाले आहेत. ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता विठ्ठल नामाचा जप करत वारीत पाऊले चालत आहेत. यंदा वारीत सहभागी होणाऱ्या दिंडीत राजकीय नेत्यांचा देखील समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते वारीत पायी वारी करणार आहेत.

ज्येष्ठ नेते शरद पवार पायी वारी करणार

ज्येष्ठ नेते शरद पवार वारीत पायी वारी करणार आहेत. त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील पायी वारी करणार आहेत. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील पायी वारी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिवेशन काळात अजित पवार (Ajit Pawar) यांनी वारीचं महत्त्व पटवून दिलं आहे. तसेच सरकारने घेतलेल्या निर्णयाची महत्त्वाची माहिती दिली आहे. आपण वारीत सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आषाढी एकादशी ही येत्या 17 जुलै रोजी असणार आहे. याचा राज्यात मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. विधानसभा निवडणुकीआधी ही पंढरीच्या वारीत राजकीय नेते मंडळी आपली उपस्थिती दाखवणार आहेत.

शरद पवार, राहुल गांधी आणि अजित पवार (Ajit Pawar) हे पंढरीच्या पायी वारीत आपली उपस्थिती दाखवणार आहेत. याबाबतची माहिती स्वत: उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. वारकऱ्यांना दिंडीतून जाताना अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे, वारकरी संप्रदाय महामंडळ आणि वारीतील प्रत्येक दिंडीला 20 हजार रुपये देण्याची संकल्पना सरकारने मांडली आहे.

अर्थसंकल्प मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदी येथे पालखी सोहळ्याला सहभागी होऊन दर्शन घेतलं. त्यानंतर पुणे शहरात देवेंद्र फडणवीस यांनी वारीत सहभाग घेतला. मात्र मला जाता आलं नसल्याचं अजित पवार म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, पालखी ही बारामतीतून जात आहे. मी बारामतीत मुक्कामाला येत आहे. काटेवाडीपर्यंत चालणार असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे.

अजित पवारांचा शरद पवारांना टोला

आता सगळ्यांना पालखीत चालावसं वाटतं, मग आपणही सहभागी होऊया, असं अजित पवार यांनी शरद पवारांचं नाव न घेता टोला लगावला. त्यावेळी त्यांच्या गालावर एक स्मित हास्य होतं. जयंतराव येतील का नाही ठाऊक नाही, पण मी घेऊन जायला तयार आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

News Title – Ajit Pawar Will Walk In Pandharichi Wari

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! पुणे शहरात उच्चशिक्षित डॉक्टरने कोयत्याने केला हल्ला

‘लाडकी बहीण योजने’साठी आता मोबाइलवरून करा अर्ज; ‘या’ स्टेप्स करा फॉलो

हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट; पुढील दोन दिवस..

आज ‘या’ 4 राशींना प्रत्येक कार्यात यश मिळेल!

“साहेब मला माफ करा”, वसंत मोरेंचा प्रकाश आंबेडकरांना मेसेज