Ajit Pawar | राज्यात नुकतंच बजेट सादर करण्यात आलं. त्यामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून अजितदादांनी राज्यातील सर्व महिलांच्या बँक खात्यात 1500 रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील महिलांना फुल न् फुलाची पाकळी या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ज्या अर्थिकदृष्ट्या महिला मागास आहेत त्यांना याचा फायदा देण्यात येणार आहे. यावर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे.
अजित पवार (Ajit Pawar) हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ते (14 जुलै) बारामतीच्या दौऱ्यावर होते. आपल्या या दौऱ्यादरम्यान त्यांनी एका सभेला संबोधित केलं आहे. भाषणामध्ये त्यांनी अनेक योजनांचा उल्लेख केला आहे. तसेच सरकार हे महिला आणि शेतकऱ्यांसाठी खूप काम करत असल्याचा देखील दावा केला आहे. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“आम्ही लाकडी बहीण योजना आणली. या योजनेवरून काही विरोधकांनी आमच्यावर टीका केली. परंतु मी त्याला फार महत्त्व दिले नाही. महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी असेल, ही योजना आपण प्रभावीपणे राबवू शकतो, असा मला विश्वास होता. या योजनेच्या माध्यमातून मला गरीब महिलेला, मातेला, माझ्या मुलीला मला मदत करायची होती. या योजनेसाठी आपण 1 जुलैला काम सुरू केलं आहे. मला उभ्या महाराष्ट्रातील महिलांना सांगायचं आहे की, महिलांनी अर्ज करावा तो वेळेत मंजूर करण्याची काळजी आम्ही करू”, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.
“महिलांनी मला सांगायचं की, या योजनेच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी होत्या. मग सरकारने पिवळे, केशरी रेशनकार्ड मंजूर केले. महिलांना याचा त्रास कमी व्हावा यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून साधारण अडीच कोटी महिलांना महिन्याला दीड हजार रूपये मिळतील”, अशी माहिती अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली आहे. तसेच लवकरच रक्षाबंधन आहे. त्यामुळे माझ्या भगिनींच्या खात्यात या योजनेचे दीड हजार रूपये येणार आहेत, अशी घोषणा करण्यात आली आहे.
अजित पवारांनी महिलेचा गोंधळ केला दूर
“मला एक महिला विचारत होती की चारचाकी वाहन असल्यावर या योजनेचा लाभ मिळणार नाही का? मी म्हणालो की, ट्रॅक्टर असलं की लाभ मिळेल. परत ती महिला मला म्हणाली की, माझे पती ड्रायव्हर आहेत. ते रात्री गाडी घेऊन घरी येतात. मग ती गाडी आमचीच समजतील. त्यात माझी काय चूक आहे. पण मी तमाम ड्रायव्हर आणि त्यांच्या पत्नींना सांगतो की, जर वाहन स्वत:च्या नावावर असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही. जे ड्रायव्हर आहेत, त्यांच्या पत्नीला योजनेचा लाभ मिळेल, असं अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान या योजनेत बदल करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन ही पाच एकर होती त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नसल्याचा नियम होता. हा नियम बदलून आता पाच एकर शेत जमीन असणाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच 60 वय वर्षांपर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार होता. मात्र आता या महिलांचे वय वर्षे हे 65 करण्यात आलं आहे.
News Title – Ajit Pawar Talk About Ladki Bahin Yojana
महत्त्वाच्या बातम्या
अनंत-राधिकाच्या लग्नात हार्दिक पांड्या 2 टकिला मागतानाचा VIDEO व्हायरल!
धक्कादायक! अमरावतीत सिटी बसने चौघांना चिरडले, 9 वर्षीय चिमूकल्याचा चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू
TATA-BSNL यांच्यात मोठा करार; जिओ, एअरटेलचं टेन्शन वाढणार?
मुंबई-पुण्यात घर घ्यायचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडाकडून महत्वाची घोषणा
वर्षांनंतर सलमान-ऐश्वर्या आले पुन्हा एकत्र?, ‘त्या’ फोटोने चर्चेला उधाण






