‘एवढं लक्षात ठेवा’ अजित पवारांची भरसभेत कविता; जयंत पाटलांना हसू अनावर

Ajit Pawar | सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा 8 वा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा विधानसभेतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत अजित पवार (Ajit Pawar) हे कविता बोलताना दिसत आहेत.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत बोलताना ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक आणि कवी विं.दा करंदीकर यांची एक कविता ऐकवली. ही कविता ऐकवण्यापूर्वी त्यांनी विरोधकांकडे बोट केलं. अजित पवारांनी (Ajit Pawar) ऐकवलेल्या कवितेचं शीर्षक ‘एवढं लक्षात ठेवा’, असं आहे.

अजित पवारांनी भरसभागृहात ऐकवलेली कविता

उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा । श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥

ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी । ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा ।।

जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा । मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा ॥

चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता । उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥

विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी । सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा ॥

दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले । तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा ॥

माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी । त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥, ही कविता अजित पवारांनी भरसभेत ऐकूण दाखवली आहे.


अजित पवारांनी ही कविता विधानसभेत ऐकवली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर दिसतंय की, अजित पवार हे विरोधकांकडे मिश्किल हसत आहेत. अजित पवारांनी ऐकवलेल्या कवितेवर सत्ताधारी बाक वाजवताना दिसत आहेत. तर विरोधकांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलताना दिसत आहे.

अजित पवारांनी ऐकवलेल्या कवितेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील हसले आहेत. त्या व्हिडीओत नाना पटोले देखील दिसत आहेत. अजित पवारांनी कवितेच्या माध्यमातून विरोधकांना मिश्किल टोला लगावला आहे.

News Title – Ajit Pawar Speak Poem In Maharashtra Assembly

महत्त्वाच्या बातम्या

लठ्ठपणा कमी करेल, ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहील; गूळ खाण्याचे आहेत ‘इतके’ फायदे

वंचितला राम राम केलेल्या वसंत मोरेंवर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल; थेट म्हणाले…

लग्नाआधीच सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट?; सोशल मीडियावर झाला खुलासा

शरद पवार आणि राहुल गांधींनंतर आता अजित पवारही करणार पायीवारी!

मोठी बातमी! नीट परीक्षेची नवी तारीख अखेर जाहीर, ‘या’ दिवशी होणार परीक्षा