शरद पवारांनी केलेली ‘नक्कल’ अजितदादांच्या जिव्हारी लागली! अजित पवार म्हणाले…

On: October 30, 2024 11:46 AM
NCP Star Campaigners
---Advertisement---

Ajit Pawar l विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच अवघ्या राज्याचं लक्ष हे बारामती विधानसभा मतदारसंघाकडे लागला आहे. कारण बारामतीमध्ये काका व पुतण्यामध्ये लढत होणार आहे. महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार रिंगणात उतरले आहेत. तर महाविकास आघाडीकडून युगेंद्र पवार मैदानात उतरले आहेत. अशातच युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ कण्हेरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली. यावेळी शरद पवारांनी अजित पवारांची नक्कल केली आहे.

प्रगल्भ नेत्याने नक्कल करणे योग्य नाही :

कण्हेरी येथे युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा पार पडली. या भर सभेमध्ये शरद पवार यांनी अजित पवार यांच्या रडण्याची नक्कल केली होती. यावेळी शरद पवार यांनी अजित पवारांची केलेल्या नक्कलेची राज्यभर चर्चा रंगली आहे. मात्र आता या ‘नक्कल’वर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, शरद पवार हे एक राष्ट्रीय व प्रगल्भ नेते आहेत. त्यामुळे प्रगल्भ नेत्याने माझी नक्कल करणे हे अनेकांना आवडलं नाही. तसेच युगेंद्र पवारांनी किंवा इतर कोणी केलं असतं तर ठीक होतं, असं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच इतके दिवस वाटत होतं की फक्त राज ठाकरेच नक्कल करतात, पण काल साहेब देखील नक्कल करताना दिसले असं अजित पवार म्हणाले आहेत.

Ajit Pawar l मी शरद पवार साहेबांना देव मानलं :

याशिवाय मी शरद पवार साहेबांना देव मानलं आहे. परंतु त्यांनी माझी नक्कल केली. कारण मी घरचा मुलगा होतो आणि माझी नक्कल त्यांनी करणे हे योग्य नव्हतं अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच शरद पवारांना ज्या उंचीवर देश व महाराष्ट्र बघतो…त्या मोठ्या नेत्याने माझी नक्कल केलेली राज्यातील अनेकांना पटली नाही.

कारण मी रात्र-दिवस एक करुन निवडणुकीत काम केलं आहे. तसेच मी आईचं नाव घेतल्यानंतर थोडं भावनिक झालो होतो असं अजित पवार म्हणाले आहेत.

News Title – ajit pawar reacted to the mimicry sharad pawar

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात 288 आमदार पदासाठी तब्बल ‘इतके’ अर्ज दाखल

राज्यात 47 मतदारसंघात होणार शिंदे विरुद्ध ठाकरे सामना, कोण मारणार बाजी?

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

लाडक्या बहीणींना महिन्याला 1500 नाही तर 3000 रुपये मिळणार?

36 तासांपासून बेपत्ता असलेले आमदार वनगा अखेर घरी परतले; पण मध्यरात्री पुन्हा..

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now