जातीवरून अजित पवार सभागृहात भडकले; सत्ताधाऱ्यांना झापलं

On: March 10, 2023 2:44 PM
---Advertisement---

मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) कामकाजाचा आजचा आठवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी शेतकरी (Farmer) प्रश्नावरुन सत्ताधाऱ्यांना कोंडित पकडलं.

अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळेही शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. अशी बिकट परिस्थिती असताना सांगलीतल्या शेतकऱ्यांना खतविक्रेत्यांकडून रासायनिक खत खरेदी करायचं असेल तर त्याला त्याची जात सांगावी लागतीये. खत खरेदी करायचं असेल तर हा जातीयवाद कशाला?, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.

शेतकऱ्यांना जात नसते. तुमच्या-माझ्या पोटाला जात नसते. तर खतखरेदी करताना जात, सांगण्याची गरज काय? असा संतप्त सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात केला आहे.

दरम्यान, ई-पॉस मशिनमधला, जात नोंदवण्याचा ऑप्शन आजच्या आज काढून टाकावा. ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं हा उपद्व्याप केला आहे, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now