Ajit Pawar Death | 28 जानेवारी 2026 हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळा ठरला. सकाळी 8.30 वाजता आलेल्या बातमीने राज्य हादरलं. कारण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. या दुर्घटनेत पाच जणांचे प्राण गेले. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असतानाच अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हिने केलेल्या वक्तव्यामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये तिने या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे.
राखी सावंतचा खळबळजनक दावा :
अजित पवार (Ajit Pawar) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या राखी सावंत म्हणाल्या, “मी अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले आहे. मला खूप दुःख झालं आहे. कोणी काहीही म्हणो, पण यामागे राजकारण नाही असं मला वाटत नाही. हे एक षडयंत्र आहे.” असं म्हणत तिने या अपघाताबाबत थेट संशय व्यक्त केला. तिच्या या विधानामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या असून चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, अजित पवार (AJit pawar) यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सत्तेच्या पातळीवरही बदलांची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्या निधनाला अजून तीन दिवसही पूर्ण झाले नसताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान हालचाली सुरू झाल्याचं चित्र दिसत आहे.
Ajit Pawar Death | राजकीय घडामोडी आणि चौकशीवर प्रश्न :
शनिवारी दुपारनंतर सुनेत्रा पवार (Sunetra pawar) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. तसेच त्यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी पुत्र पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. मध्यरात्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार मुंबईत दाखल झाल्याची माहितीही समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कालपासून राजकीय हालचाली वेगाने घडताना दिसत आहेत. (Ajit Pawar plane crash)
दरम्यान, बारामती विमानतळावरील पायाभूत सुविधांबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्या दिवशी दृश्यमानता 800 ते 3,000 मीटर दरम्यान होती, जी सुरक्षित लँडिंगसाठी अपुरी मानली जात होती. तसेच PAPI आणि ILS सारख्या अत्यावश्यक प्रणालींच्या अभावामुळेही चौकशीच्या दृष्टीने नवे मुद्दे पुढे येत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अपघातामागील कारणांबाबत चौकशीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.






