अजित पवारांच्या विमानाबाबत मोठी अपडेट; सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

On: January 30, 2026 11:21 AM
Ajit Pawar Plane Crash Investigation
---Advertisement---

Ajit Pawar Plane Crash Investigation | राज्यातील राजकीय वर्तुळाला हादरवून टाकणाऱ्या घटनेत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. बारामती विमानतळाजवळ झालेल्या या भीषण दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, या घटनेभोवती अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काहींनी हा अपघात असल्याचं म्हटलं असलं, तरी काही राजकीय नेते आणि नागरिकांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) मार्फत चौकशी सुरू करण्यात आली असून, आता राज्य सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी या प्रकरणाचा तपास थेट राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला आहे. त्यामुळे या दुर्घटनेची चौकशी आता दोन स्तरांवर होणार असल्याने सत्य लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Ajit Pawar Plane Crash Investigation)

विमान अपघात तपास ब्युरोकडून चौकशी सुरू :

विमान अपघात तपास ब्युरोच्या तीन सदस्यीय पथकाने घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक तपास सुरू केला असून, विमानाचा ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. या ब्लॅकबॉक्समधून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे अपघाताच्या काही क्षणांपूर्वी नेमकं काय घडलं, विमानाची तांत्रिक स्थिती काय होती, तसेच पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्यातील संवाद कसा होता, याचा तपशील समोर येणार आहे.

काही अहवालांनुसार, अपघाताच्या वेळी बारामती परिसरात कमी दृश्यमानता होती. मात्र, दूरवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये विमान स्पष्टपणे दिसत असल्याने या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारत, जर धुकं असेल तर सीसीटीव्हीत विमान इतक्या स्पष्टपणे कसं दिसतं, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे या अपघातामागे नेमकी कोणती कारणं होती, याचा सखोल तपास आवश्यक असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

Ajit Pawar Plane Crash Investigation | CID कडून स्वतंत्र चौकशी, संशयावर पडदा उठणार? :

विविध स्तरांवरून संशय व्यक्त होत असल्याने राज्य सरकारने या प्रकरणाची CID कडूनही चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या तपासामुळे तांत्रिक बिघाड, पायलटची चूक, हवामानातील बदल, की कोणता मानवी हस्तक्षेप, या सर्व शक्यतांचा बारकाईने अभ्यास केला जाणार आहे. सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, या चौकशीत कोणालाही वाचवलं जाणार नाही आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. (Ajit Pawar Plane Crash Investigation)

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना उमटत आहेत.

News Title : Ajit Pawar Plane Crash Investigation: Government Orders CID Probe Along with AAIB Inquiry

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now