विधानसभेला महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला?, अजित पवार म्हणाले..

On: August 8, 2024 12:21 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांचं लक्ष आता विधानसभेच्या निवडणुकीकडे लागलं आहे. महायुतीसह महाविकास आघाडी यासाठी तयारीला लागली आहे. मनसेकडून देखील जागांची चाचपाणी केली जात आहे. सध्या मविआ आणि महायुती जागा वाटपसंदर्भात फॉर्म्युला ठरवत आहे. (Maharashtra Assembly Election 2024) अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीमध्ये कुणाला किती जागा मिळणार?, याबाबत भाष्य केलं आहे.

नाशिकमधून आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली आहे. या दरम्यान, अजित दादा यांनी विधानसभेसाठी जागावाटप या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

काय म्हणाले अजित पवार?

“लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी एक नरेटीव्ही सेट केला होता. संविधान बदलणार आरक्षण काढणार, असं नेरटीव्ह सेट करुन त्यांनी जनतेची दिशाभूल केली. त्याची मोठी किंमत महायुतीला चुकवावी लागली.”, असं अजित पवार म्हणाले.

“लोकसभेला जे झालं, तस विधानसभेला होऊ नये. कुठलंही नरेटिव्ह विरोधी पक्षांनी सेट करण्याचा प्रयत्न केला, तर त्याची योग्य माहिती देणार. यासाठी आम्ही जनसन्मान यात्रा सुरु केली आहे.”, असंही अजित पवार म्हणाले. या यात्रेत(Maharashtra Assembly Election 2024) अजित पवार यांनी गुलाबी जॅकेट घातलं आहे.

नाशिकमधून आजपासून अजित पवार यांच्या पक्षाची जनसन्मान यात्रा सुरु झाली आहे. यात्रेसाठी सगळं कॅम्पन गुलाबी रंगात केलं आहे. त्यामुळे याची देखील राज्यभर चर्चा रंगली आहे. यावेळी अजित पवार यांनी महायुतीमधील जागावाटप संदर्भात देखील माहिती दिली.

“सीट वाटपमध्ये सध्या ज्या जागा आमच्या तिन्ही पक्षांकडे आहेत, त्या तशाच ठेवल्या जातील. जर काही विद्यमान जागा बदलायच्या असतील, तर त्याची मानसिक तयारी तिन्ही पक्षांनी केली आहे.”, असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता कुणाला किती आणि कोणत्या जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं (Maharashtra Assembly Election 2024) आहे.

News Title :  Ajit Pawar on Maharashtra Assembly Election 2024

महत्त्वाच्या बातम्या-

समंथाचा एक्स नवरा पुन्हा पडला प्रेमात; ‘या’ अभिनेत्रीशी थाटणार दुसरा संसार

RBI चे नवीन पतधोरण जाहीर; तुमचा कर्जाचा EMI वाढणार की घटणार?

नागपंचमीच्या दिवशी ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी, तुमच्या आयुष्यात येणार नाही संकट!

विनेश फोगाटला भारतरत्न आणि खासदारकी मिळणार? ‘या’ पक्षाने केली मागणी

या दोन राशींची होणार चांदी; गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ 2 राशींना मिळणार पैसाच पैसा

Join WhatsApp Group

Join Now