Ajit Pawar NCP | महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर झाली आहे. या चौथ्या यादीतून दोघांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामुळे अजित पवारांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 51 उमेदवारांना संधी दिलीये. (Ajit Pawar NCP)
या चौथ्या यादीत मोर्शी मतदारसंघातून देवेंद्र महादेवराव भुयार यांना संधी देण्यात आली आहे. तर, भोर या विधानसभा मतदारसंघात शंकर हिरामण मांडेकर यांना तिकीट देण्यात आलंय. अजित पवार गटाने आतापर्यंत 51 उमेदवार जाहीर केले आहेत. तर, भाजपने आतापर्यंत 146 उमेदवार जाहीर केले असून शिंदेंनी सहयोगी मित्र पक्षांसह 80 जागा जाहीर केल्या आहेत.
म्हणजेच महायुतीत आतापर्यंत 277 जागा जाहीर झाल्या आहेत. उर्वरित 10 जागा अद्यापही जाहीर होणे बाकी आहे. त्या कोणाच्या वाट्याला जातात हे पाहावं लागणार आहे. या उर्वरित जागा जाहीर झाल्यानंतरच महायुतीतील फॉर्म्युला स्पष्ट होईल.
अजित पवार गटाची चौथी यादी
मोर्शी मतदारसंघ- देवेंद्र महादेवराव भुयार
भोर मतदारसंघ- शंकर हिरामण मांडेकर (Ajit Pawar NCP)
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन आणि विजयी शुभेच्छा.#विजयी_भव_महाराष्ट्रवादी#MaharashtraElection2024 pic.twitter.com/PyK8Xx12UC
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) October 28, 2024
अजित पवार गटाची तिसरी यादी
गेवराई – विजयसिंह पंडित
फलटण- सचिन पाटील
निफाड – दिलीपकाका बनकर
पारनेर – काशिनाथ दाते (Ajit Pawar NCP)
News Title – Ajit Pawar NCP fourth candidates list
महत्त्वाच्या बातम्या-
आज धनत्रयोदशी, देवी लक्ष्मी ‘या’ राशींवर करणार धन-सुखाचा वर्षाव!
‘या’ बड्या नेत्याच्या उपस्थितीत निलंगेकर उमेदवारी अर्ज भरणार
निलंगेकर यांना पाठबळ देण्याची गरज; अवधूत गुप्ते
भाजपने बूथ प्रमुखांच्या बळावर निवडणुका जिंकल्या- संभाजी पाटील निलंगेकर






