उद्या अजित पवारांवर होणार अंत्यसंस्कार; जाणून घ्या वेळ आणि ठिकाण

On: January 28, 2026 4:35 PM
Ajit Pawar Death
---Advertisement---

Ajit Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणाऱ्या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अंत्यसंस्कारांची तयारी पूर्ण झाली आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, उद्या बारामती येथे त्यांच्या कर्मभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. या कार्यक्रमासाठी देशातील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

शासकीय इतमामात अंत्यविधीची तयारी :

28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर 29 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या अंत्यविधीवेळी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना दिली जाणार आहे. पवार कुटुंबीयांनी तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार (Ajit Pawar) यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणले जाणार आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव तेथे ठेवण्यात येणार असून, त्यानंतर अंत्ययात्रा निघेल आणि अंत्यसंस्कार विधी पार पडेल. या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली असून, परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Ajit Pawar | पंतप्रधान व केंद्रीय नेत्यांची उपस्थिती :

या दु:खद प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे स्वतः बारामतीत उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यांनी आधीच शोक व्यक्त केला असून, शरद पवार (Sharad Pawar) यांना फोन करून सांत्वन दिले आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे बारामती परिसरात नो फ्लाय झोन लागू करण्यात आला असून, केंद्र व राज्य सरकारच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती अपेक्षित आहे.

अजित पवार यांची महाराष्ट्रात ‘लाडके दादा’ अशी ओळख होती. सामान्य नागरिकांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांमध्ये त्यांना मोठे प्रेम आणि विश्वास मिळाला होता. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच राज्यभरातून शोकसंदेशांचा पूर आला असून, समाजमाध्यमांवर अनेकांनी भावना व्यक्त केल्या आहेत. बारामती शहरात सध्या शोकाकूल वातावरण असून, उद्या लाखो नागरिक आणि कार्यकर्ते त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

News Title: Ajit Pawar Funeral in Baramati

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now