Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीमधून उभे राहिले आहेत. त्यांच्याविरोधात येथे शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. युगेंद्र पवार अर्ज भरताना त्यांच्यासोबत स्वतः शरद पवारांनी हजेरी लावली होती. यातून ही निवडणूक शरद पवारांसाठी महत्वाची असल्याचं दिसून येतं. लोकसभेत बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या होत्या. येथे सुप्रिया सुळे या विजयी झाल्या. लोकसभेत अजित पवार गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे विधानसभा जिंकून दाखवणं अजित पवारांसाठी मोठं आव्हान असणार आहे. (Ajit Pawar)
अजित पवार महायुतीमध्ये असल्याने त्यांनी महायुतीच्या विविध योजना या प्रचाराच्या मुद्यात आणल्या आहेत. गेल्या काही महिन्यात महायुतीच्या तिन्ही पक्षांनी लाडकी बहीण योजनेचा मोठा प्रचार केलाय. अशात अजित पावर यांनी बारामतीमधून आपणच विजयी होणार, असा विश्वास व्यक्त केलाय.
काय म्हणाले अजित पवार?
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. त्यांनी युगेंद्र पवार यांच्याबाबतही वक्तव्य केलं. “युगेंद्र पवार माझ्या विरोधात आहेत, त्यावर मला जास्त काही बोलायचं नाही. कारण देशात लोकशाही आहे. प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे, तसा तो उमेदवार म्हणून उभा आहे. त्यांच्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. बारामतीचे मतदार सुज्ञ आहेत, असा माझा ठाम दावा आहे.”,असं अजित पवार म्हणाले आहेत.
“आमच्या परिने आम्ही आमची बाजू मांडू. ते त्यांच्या बाजूने मांडतील. बारामतीकरांना वाटेल त्या पध्दतीचा कौल ते देतील.”, असंही अजित पवार म्हणाले आहेत. एकंदरीत त्यांनी बारामतीमध्ये आपणच विजयी होणार, असा विश्वास व्यक्त केलाय. यावेळी त्यांना काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार का?, असा सवाल देखील करण्यात आला होता. यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) दिलेलं उत्तर राजकारणात चर्चेत आलंय.
अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का?
“काँग्रेस शिवसेना एकत्र येईल, असं तुम्हाला वाटलं होतं का? राजकारणात काहीही होऊ शकतं. राजकारणात चढ उतार येत असतात. जमिनीवर पाय ठेवून काम करायचं असतंय. आमचं सरकार लोकाभिमुख कारभार करत आहे. लाडकी बहिण योजना असेल, शेतकरी वीज माफी योजना असेल, दुधाचे अनुदान सात रुपये केले आहे या गोष्टी आम्ही केल्या आहेत.”, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
यावेळी शरद पवारांनी केलेल्या नक्कलवर देखील अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार साहेबांनी माझी नक्कल करणं अनेकांना आवडलेलं नसल्याचं ते म्हणाले. साहेबांनी माझी नक्कल करणं हे वेदनादायी आहे. साहेबांना मी माझं दैवत मानलं पण त्यांनी माझी नक्कल केली, अशा शब्दांत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
News Title – Ajit Pawar confident of victory in Baramati
महत्त्वाच्या बातम्या-
शरद पवारांनी केलेली ‘नक्कल’ अजितदादांच्या जिव्हारी लागली! अजित पवार म्हणाले…
राज्यात 288 आमदार पदासाठी तब्बल ‘इतके’ अर्ज दाखल
राज्यात 47 मतदारसंघात होणार शिंदे विरुद्ध ठाकरे सामना, कोण मारणार बाजी?






