राजकीय भूकंप! अजितदादांचा निकटवर्तीय शिंदे गटात सामील

On: December 27, 2025 7:02 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar | महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. अशातच नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. (Ajit Pawar News)

ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून मंत्री छगन भुजबळ यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर समर्थक नेते यांनी थेट एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

भुजबळांचे कट्टर समर्थक शिंदे गटात दाखल :

मिळालेल्या माहितीनुसार मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे निकटवर्तीय नेते कैलास मुदलियार यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुदलियार आणि शिंदे गटामध्ये प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती, अखेर आज हा पक्षप्रवेश पार पडला.

नाशिकमध्ये कैलास मुदलियार यांची ओळख ही भुजबळ यांचे कट्टर समर्थक आणि विश्वासू सहकारी अशीच होती. त्यामुळे त्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीला आणि विशेषतः छगन भुजबळ यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

Ajit Pawar | शिंदे सेनेची रणनीती, भुजबळ कोंडीत :

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाचे सुहास कांदे आणि अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांच्यात थेट राजकीय सामना रंगणार आहे. हे दोन्ही नेते परस्परांचे कट्टर विरोधक मानले जातात. अशा परिस्थितीत शिंदे सेनेने ही चाल खेळत भुजबळांना कोंडीत पकडल्याचं चित्र आहे.

मुदलियार यांच्या प्रवेशामुळे नाशिकमध्ये शिंदे गटाची ताकद वाढणार असून, महायुतीत असतानाही भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) नाशिकमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.

प्रभाग 20 मधून निवडणूक लढवण्याची शक्यता :

कैलास मुदलियार यांच्या शिवसेना प्रवेशावेळी मंत्री दादा भुसे उपस्थित होते. शिवसेनेच्या नाशिक येथील कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मिळालेल्या माहितीनुसार मुदलियार हे नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे.

मुदलियार यांच्या पक्षांतरामुळे भुजबळांना किती नुकसान सहन करावे लागणार आणि ते ही राजकीय पोकळी कशी भरून काढणार, याकडे आता संपूर्ण नाशिकचं लक्ष लागलं आहे.

News title : Ajit Pawar Camp Shocked as Chhagan Bhujbal’s Close Aide Joins Shinde Sena Ahead of Nashik Elections

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now